अकोला - येथील जुना भाजी बाजारातील दुकानातील श्री नारायणी ट्रेडर्स या दुकानातून चोरट्यांनी सिगारेटचे बॉक्स आणि रोख चार लाख रुपये चोरून नेल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
VIDEO : आलिशान गाडीतून चोरी, सिगारेटच्या बॉक्ससह 4 लाखांची रोकड लंपास - thieves theft cigarette box akola
श्री नारायणी ट्रेंड्स दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. दुकानातील महागड्या कंपनीचे सिगारेटचे पाकीट, तसेच सिगारेट भरलेले बॉक्स असा एकूण लाखो रुपयांचा माल आणि दुकानाच्या गल्ल्यात असलेली 4 लाख रुपयांची रोख रक्कमही चोरून नेली. ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या एका दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हेही वाचा -काडीमोड घेतला... आता रिपब्लिकन सेना करणार राज्यभर पक्ष बांधणी
श्री नारायणी ट्रेंड्स दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. दुकानातील महागड्या कंपनीचे सिगारेटचे पाकीट, तसेच सिगारेट भरलेले बॉक्स असा एकूण लाखो रुपयांचा माल आणि दुकानाच्या गल्ल्यात असलेली 4 लाख रुपयांची रोख चोरून नेली. ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या एका दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. विशेष म्हणजे, चोरटे एका पांढऱ्या आलिशान कारमध्ये चोरी करण्यासाठी आल्याचे या दिसत आहे. चोरट्यांनी चोरी केलेला माल त्या कारमध्ये ठेवल्याचे कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसून येत आहे. तर ज्या ठिकाणी ही चोरी झाली. सराफा पोलीस चौकी हाकेच्या अंतरावर असतानाही ही घटना घडली. त्यामुळे या चौकीत रात्रपाळीवर तैनात असलेल्या पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.