अकोला - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील एमपी बिअर बारमधुन चोरट्यानी महागड्या ब्रँडची विदेशी दारूचे बॉक्स चोरून नेल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. विदेशी दारूचे 20 बॉक्स चोरट्यानी चोरून अंदाजे अडीच लाख रुपयांवर हाथ मारला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.
एमपी बिअर व बार रेस्टॉरंट मध्ये अज्ञात चोरट्यानी खिडकीच्या माध्यमातून प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी थेट गोदामाकडे आपला मोर्चा वळविला. चोरट्यांनी गोदामाचे कुलूप उघडून त्यातील महागड्या ब्रँडचे विदेशी दारूचे बॉक्स चोरले. जवळपास त्यांनी 20 बॉक्स गोदामातून काढले. सर्व बॉक्स त्यांनी आणलेल्या कार मध्ये टाकले व पोबारा केला. बारचे मालक हे दुपारी बारा उघडण्यासाठी आले असता त्यांना टेबलावर दारूचा बॉक्स बाहेर व टेबलावर फुटलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी याबाबत जुने शहर पोलीस ठाण्यात माहिती दिली.
जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल-
शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम, जुने शहर पोलीस निरीक्षक देशमुख हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यासोबतच श्वान पथक, ठसे तज्ञ पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. चोरट्यानी अंदाजे अडीच लाखांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. सीमांत तायडे यांनी याप्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.
बॉक्स फुटल्याने लक्षात आली चोरी
चोरटे हे विदेशी दारूचा बॉक्स घेऊन जात असताना त्यांच्या हातातून एक बॉक्स टेबलावर पडला. त्यामुळे तो फुटल्याने त्याचा आवाज झाला. त्यानंतर चोरटे पळून गेले. सीमांत तायडे यांनी जेव्हा बार उघडला तेव्हा चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला.
खिडकीला नव्हते ग्रील
एमपी बार अँड रेस्टॉरंटच्या खिडकीला लोखंडी ग्रील नसल्याने चोरटे हे सहज काचेच्या दरवाजा उघडून आत गेले. चोरी केल्यानंतर ते त्यामधूनच सुरक्षित बाहेर आले. चोरट्याना आत प्रवेश करण्यासाठी कुठलेही दरवाजा किंवा खिडकी फोडण्यासाठी कामच पडले नाही.
हेही वाचा-कोरोना लस निर्माण होणाऱ्या ठीकाणी आगीचा प्रादुर्भाव नाही, मंत्र्यांची माहिती