महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 9, 2022, 10:45 PM IST

ETV Bharat / state

Central Bank of India : चोरट्यांनी गॅस कटरने तिजोरी फोडून लुटली लाखोंची रक्कम

तेल्हारा तालुक्यातील उकळी बाजार येथे मंगळवारी (दि.8 फेब्रुवारी) रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी गॅस कटरच्या ( Gas Cutter ) सहायाने सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाची ( Central Bank of India ) तिजोरी फोडल्याचे आज (दि. 9 फेब्रुवारी) सकाळी निदर्शनास आले. तिजोरीतील 8 लाख 64 हजारांच्या मुद्देमालावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. या घटनेत दोन पेक्षा जास्त आरोपी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

घटनास्थळ
घटनास्थळ

अकोला- तेल्हारा तालुक्यातील उकळी बाजार येथे मंगळवारी (दि.8 फेब्रुवारी) रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी गॅस कटरच्या ( Gas Cutter ) सहायाने सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाची ( Central Bank of India ) तिजोरी फोडल्याचे आज (दि. 9 फेब्रुवारी) सकाळी निदर्शनास आले. तिजोरीतील 8 लाख 64 हजारांच्या मुद्देमालावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. या घटनेत दोन पेक्षा जास्त आरोपी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

माहिती देताना बँकेचे शाखाधिकारीउपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोकर

तेल्हारा तालुक्यातील उकळी बाजार येथे सेंट्रल बँकेची शाखा असून या शाखेमध्ये 8 फेब्रुवारीच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी बँकेच्या मागील भागातील लाकडी खिडकी तोडून आत प्रवेश केला. गॅस कटरच्या सहायाने सेंट्रल बँकेची तिजोरी फोडून तिजोरीतील 8 लाख 64 हजाराचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना तेल्हारा पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सुद्धा घटनास्थळाला भेट दिली असून सहायक पोलीस अधीक्षक तथा अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोकर ( Deputy Superintendent of Police ) या देखील घटनास्थळी हजर होत्या. अधिक तपासासाठी अकोला येथून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तसेच संशोधक यंत्रणांनीही येथे धाव घेतली. बँकेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन चोरट्यांचा वावर दिसत असून या घटनेत दोन पेक्षा अधिक जास्त आरोपी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

60 वर्ष जुनी इमारत -ज्या इमारतीमध्ये ही बँक आहे ती इमारत 60 वर्षे जुनी आहे. चुना मातीचे बांधकाम आहे. ही इमारत जुनी असल्याने तिची तोडफोड सहज होवू शकते. तिच्या भीतीही मजबूत नसल्याने चोरटे सहज आतमध्ये शिरले असल्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फड यांनी सांगितले.

हेही वाचा -Fake Currancy Seized : अकोल्यात 23 लाख 96 हजाराच्या बनावट नोटा जप्त; तिघांना अटक, एक आरोपी फरार

ABOUT THE AUTHOR

...view details