अकोला- व्हीएचबी कॉलनीतील दोन घरांमधून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. या दोन्ही चोरीच्या घटना आज पहाटे घडल्या. यासंदर्भात खदान पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. दरम्यान, एकाच परिसरात दोन ठिकाणी झालेल्या या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दोन घरातून चोरट्यांचा ५ लाखांवर डल्ला; खदान पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह - Shailesh Mishra VHB Colony Theft akola
खदान पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या व्ही.एच.बी. कॉलनीतील वसंतराव डंबलकर यांच्या घराचे दार तोडून चोरट्यांनी ४ लाख ४९ हजार रुपयांचा ऐवज चोरला व तेथून पसार झाले. याच परिसरातील शैलेश मिश्रा यांच्या देखील घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी कपटामधील ३५ हजार रुपये रोख लंपास केले.
![दोन घरातून चोरट्यांचा ५ लाखांवर डल्ला; खदान पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह akola](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5194131-thumbnail-3x2-op.jpg)
खदान पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या व्ही.एच.बी. कॉलनीतील वसंतराव डंबलकर यांच्या घराचे दार तोडून चोरट्यांनी ४ लाख ४९ हजार रुपयांचा ऐवज चोरला व तेथून पसार झाले. याच परिसरातील शैलेश मिश्रा यांच्या देखील घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी कपाटामधील ३५ हजार रुपये रोख लंपास केले. या घटनेची माहिती खदान पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळी श्वान पथक आणि ठसेतज्ञ पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा-कापशी तलावाच्या सौंदर्यीकरणाबाबत मनपा उदासीन, शेतीसाठी पाण्याची मागणी