अकोला -वाडेगाव रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जाणेही कठीण झाले आहे. परिणामी, हा दुरुस्त करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन जागतिक बँक प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले होते. तरिही त्यांनी हा रस्ता दुरुस्त केला नाही. शेवटी या युवकाने आत्मदहनाचा इशारा प्रशासनाला दिला. मात्र, प्रशासन एक पाऊल मागे सरकले नसल्याने युवकाने मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आत्मदहनचा इशारा दिला. शेवटी कार्यकारी अभियंता यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर युवकाने आपले आंदोलन मागे घेतले आहे. शैलेश मापारी असे आंदोलकांचे नाव असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.
रस्त्यावर लहानमोठे अपघात
वाडेगाव रस्त्यावरून जाताना अनेक त्रास सहन करावा लागतात. वाहनचालकांना तर जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून जावे करावे लागते. या रस्त्यावर लहानमोठे अपघात झाले आहे. त्यामध्ये अनेकांचा जीव गेला आहे. तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. या रस्त्यावरील धुळीमुळे अनेकांना डोळ्यांचा, फुफुस्साचा, श्वसनाचा त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्त्यावर अनेक वेळा दुरुस्त करावा, अशी मागणी करण्यात आली.