अकोला - सिंधी कॅम्प परिसरात 41 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. याच व्यक्तीची पत्नी आणि त्याचा 31 वर्षीय नोकरीही पॉझिटिव्ह आढळला आहे. या दोघांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डात उपचार सुरू आहे. तर प्राप्त झालेल्या 42 अहवालांपैकी इतर 39 अहवाल निगेटिव्ह आले आहे.
सिंधी कॅम्पमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची पत्नी आणि नोकरही कोरोनाबाधित
सिंधी कॅम्प परिसरात राहणाऱ्या व्यक्तीचा कोरोना अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हा परिसर सील करून त्याच्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, त्याच्याकडे काम करणाऱ्यांची तपासणी केली होती. या तपासणीमध्ये कोरोनाबाधित व्यक्तीची पत्नी आणि त्याच्याकडे काम करणारा व्यक्ती जो न्यू भिमनगर येथे राहतो हे दोघे पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.
सिंधी कॅम्प परिसरात राहणाऱ्या व्यक्तीचा कोरोना अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हा परिसर सील करून त्याच्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, त्याच्याकडे काम करणाऱ्यांची तपासणी केली होती. या तपासणीमध्ये कोरोनाबाधित व्यक्तीची पत्नी आणि त्याच्याकडे काम करणारा व्यक्ती जो न्यूभिमनगर येथे राहतो हे दोघे पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.
या दोघांवरही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. तसेच न्यू भिमनगर येथे राहणाऱ्या व्यक्तीच्या घरातील नातेवाईक आणि संपूर्ण परिसर प्रशासनाकडून ताब्यात घेऊन तिथे सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. अकोल्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 19 झाली आहे. तर प्रत्यक्षात उपचार घेणाऱ्यांची संख्या नऊ आहे.