अकोला - स्थानिक गुन्हे शाखेने आज गोवंश चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून 23 गोवंश चोरीचे गुन्हे उघड केली आहे. त्यापैकी सहा जणांना अटक केली असून काही जण फरार होण्यात यशस्वी झाले आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने गोवंश विकून कमविलेली रोख रक्कम दोन लाख 52 हजार 900 रुपये आणि गोवंश चोरीसाठी वापरलेल्या चारचाकी वाहने जप्त केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने गोवंश चोरी करणाऱ्या टोळीला केली अटक, 16 लाखांचा मुद्देमाल जप्त - गोवंश चोरी बद्दल बातमी
स्थानिक गुन्हे शाखेने गोवंश चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली आहे. या टोळीकडून 23 गुन्हे उघड झाले असून 16 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यात वर्षभरात गोवंश चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शैलेश सपकाळ यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक सागर हटवार यांना जबाबदारी दिली. यामध्ये गुप्त माहितीच्या आधारवर त्यांनी गोवंश चोरी करणारे शेख शकील शेख जलील, मोहम्मद फहीम मोहम्मद जमिल यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी अब्बासी जाफरी अफजल हुसैन (फरार आरोपी), शेख सोहेल शेख युसूफ, मोहम्मद मुजीब उर्फ मज्जू लंगडा मोहम्मद सलिम, अजमत शहा रहमत शहा (फरार आरोपी), शोएब बेग अजहर बेग, शेख रेहान शेख युसुफ कुरेशी, शेख सलमान शेख आमद कुरेशी, अज्जू यांनी 23 गुन्ह्याची कबुली दिली आहे.
पातूर येथे पाच, बाळापूर चार, सिव्हिल लाईन येथे तीन, अकोट फाईल दोन, बार्शीटाकळी दोन, मूर्तिजापूर ग्रामीण व डाबकी रोड पोलिस ठाण्यात प्रत्येकी दोन, सिटी कोतवाली आणि उरळ पोलिस ठाण्याअंतर्गत प्रत्येकी एक गुन्हे या टोळीनी 23 गुन्हे कबूल केले आहेत. गोवंश चोरी प्रकरणात वापरलेल्या चार कार किंमत 14 लाख व गोवंश चोरी करून विकलेली दोन लाख 52 हजार 900 जप्त केले आहेत.