महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आधी अर्थमंत्र्यांनी झिरो बजेट शेती करून दाखवावी - अविनाश नाकट - जिल्हाध्यक्ष अविनाश नाकट

शेती ही कधीच झिरो बजेट होऊ शकत नाही. त्यांची ही संकल्पना जर खरी असेल तर त्यांनी आधी झिरो बजेट शेती करून दाखवावी. नंतरच हा मुद्दा त्यांनी उपस्थित करणे गरजेचे होते, असे परखड मत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश नाकट यांनी व्यक्त केले आहे.

शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश नाकट

By

Published : Jul 6, 2019, 8:54 PM IST

अकोला - केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी देशाचा बजेट सादर करताना झिरो बजेट शेती ही संकल्पना मांडली आहे. ही अफलातून संकल्पना त्यांनी कशी मांडली हे मला कळत नाही. शेती ही कधीच झिरो बजेट होऊ शकत नाही. त्यांची ही संकल्पना जर खरी असेल तर त्यांनी आधी झिरो बजेट शेती करून दाखवावी. नंतरच हा मुद्दा त्यांनी उपस्थित करणे गरजेचे होते, असे परखड मत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश नाकट यांनी व्यक्त केले आहे.

शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश नाकट यांनी अर्थसंकल्पावर मत मांडले

अर्थमंत्री यांनी संसदेत दोन तास दहा मिनिटात भाषण केले. या भाषणामध्ये शेतीसाठी त्या विशेष काहीच बोलल्या नाहीत. प्रक्रिया उद्योग आणि नवतंत्रज्ञान संदर्भात त्यांच्याकडून शेतकऱ्यांना काहीच मिळालेले नाही. पण त्यांनी २०२२ शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू असे म्हटले आहे. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने आपल्याला तंत्रज्ञान आवश्यक आहे. त्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण उत्पन्न दुप्पट करू शकतो. शिवाय रासायनिक खते आणि बियाणे याबाबतीतही त्या काहीच बोलल्या नाही, असेही ते म्हणाले.

जर झिरो बजेट शेती करायची असेल तर शेतकरी निर्यात करू शकणार नाही. कारण आपली आंतरिक गरज पूर्ण होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतो म्हणणे हा अफलातून विषय आहे. आधीच्या सरकारने सुध्दा शेतकऱ्यांची लूट केली होती. या सरकारनेही तेच धोरण अवलंबून उलट त्यामध्ये वाढ केलेली आहे. शेतकरी संघटनेला हा लढा मोठ्या प्रमाणात उभारावा लागणार असल्याचेही अविनाश नाकट म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details