अकोला- शेतातील पिकांचे वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. मात्र, वन्य प्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्याकरीता शेतीला लोखंडी कुंपण करणे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. तसेच शेतीला लोखंडी तारांच्या माध्यमातून विद्युत प्रवाह लावून शेतीला कुंपण केल्यास वन्यप्राण्यांचा मृत्यू होऊ शकतो. यावर उपाय म्हणून अकोट तालुक्यातील खापरवाडी येथील एका शेतकऱ्याने विना खर्चाचा रामबाण उपाय शोधला आहे. जगन बगाडे या युवा शेतकऱ्याने निवडूंग वनस्पतीचे जैविक कुंपण करून शेतीतील पिकांना संरक्षण दिले आहे. त्याचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरला आहे.
नैसर्गिक आपत्ती त्यासोबतच वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी नानाविध प्रयोग करतो. परंतु, त्यामध्ये तो यशस्वी होत नाही. शेवटी वन्यप्राण्यांच्या तावडीतून पीक वाचविण्यासाठी शेतकरी शेतात रात्रंदिवस पहारा देतो. तरीही वन्य प्राण्यांचा सुळसुळाट शेतकऱ्यांना शांत बसू देत नाही.
कौतुकास्पद..! अकोल्यात पिकांच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांने शेतात उभे केले नैसर्गिक कुंपण - अकोल्यात शेतकऱ्याने केले निवडुंगाचे कुंपण
अकोट तालुक्यातील खापरवाडी येथील एका शेतकऱ्याने वन्यप्राण्यांपासून पिके वाचवण्यासाठी विना खर्चाचा रामबाण उपाय शोधला आहे. जगन बगाडे या युवा शेतकऱ्याने निवडूंग वनस्पतीचे जैविक कुंपण करून शेतीतील पिकांना संरक्षण दिले आहे. त्याचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरला आहे.
अकोल्यात पिकांच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांने शेतात उभे केले नैसर्गिक कुंपण
Last Updated : Mar 21, 2021, 4:06 PM IST