महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कृषी सेवा केंद्र सकाळी सात ते दुपारी तीनपर्यंत राहाणार सुरु - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश

सद्यस्थितीमध्‍ये खरीप हंगाम सुरु असल्‍याने तसेच शेतीचे कामे सुरु असल्‍यामुळे कृषी निविष्‍ठा व त्‍या संबंधीत कृषि सेवा केन्‍द्र, कृषी अवजारे, कृषी साहीत्‍य बि-बियाणे विक्री सेवा केन्‍द्रे यासाठी सकाळी सात ते दुपारी तीन या कालावधीत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

जितेंद्र पापळकर
जितेंद्र पापळकर

By

Published : May 23, 2021, 8:40 AM IST

अकोला - जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर १५ मे ते १ जून या कालावधीसाठी निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, खरीप हंगाम जवळ आलेला असताना कृषी निविष्ठा शेतकऱ्यांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी कृषी सेवा केंद्रांना सकाळी सात ते दुपारी तीन अशी वेळ वाढवून देण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आदेश

पूर्वीच्या आदेशात ही वेळ सकाळी सात ते दुपारी दोन अशी होती. मात्र सद्यस्थितीमध्‍ये खरीप हंगाम सुरु असल्‍याने तसेच शेतीचे कामे सुरु असल्‍यामुळे कृषी निविष्‍ठा व त्‍या संबंधीत कृषि सेवा केन्‍द्र, कृषी अवजारे, कृषी साहीत्‍य बि-बियाणे विक्री सेवा केन्‍द्रे यासाठी सकाळी सात ते दुपारी तीन या कालावधीत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

निविष्‍टा वाटप, ई-कॉमर्स (ऑनलाईन विक्री)घरपोच सेवा इ. पद्धतीचा करणार वापर

जिल्‍हयातील कोविड रुग्‍णसंख्‍येची वाढ लक्षात घेता बांधावर निविष्‍टा वाटप, ई-कॉमर्स (ऑनलाईन विक्री) , घरपोच सेवा इ. पद्धतीचा वापर करुन थेट संपर्क कमी करता येईल व शेतकऱ्यांना निविष्‍ठा उपलब्‍ध होतील यासाठी जिल्‍हा अधिक्षक, कृषी अधिकारी तसेच संबंधित तालुका कृषी अधिकारी यांनी त्‍यांच्या स्‍तरावर आवश्‍यक ते नियोजन करावे, असे आदेशात म्हणले आहे.
कोविडच्या पार्श्वभुमीवर कृषी सेवा केंद्र व संबंधित दुकानांमध्‍ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोविड चाचणी करुन घेणे अनिवार्य राहील. सर्व प्रकारच्‍या कृषी उत्‍पादने व साहित्‍याचा पुरवठा हा नियमितपणे सुरु राहील तसेच कृषी साहित्‍य व उत्‍पादने यांची मालवाहतूक या करिता स्‍वतंत्र परवानगीची आवश्‍यकता राहणार नाही. कोविड या विषाणूच्या प्रादुर्भावात वाढ होवू नये या करिता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचे तंतोतत पालन करण्‍यात यावे,असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

हेही वाचा-'विरोधक काय टीका करतात त्याकडे दुर्लक्ष करा, तो एकप्रकारचा ब्लॅक फंगसच आहे'

ABOUT THE AUTHOR

...view details