महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

VIDEO : अकोल्यात धावत्या कारने घेतला पेट; जीवितहानी नाही

अकोट फाइल पुलावरून धावत्या कारने बुधवारी (आज) रात्री 9 वाजता अचानक पेट घेतला. यामुळे रस्त्यावर असलेल्या वाहनचालकांची एकच धांदल उडाली. दरम्यान, कारमधील व्यक्ती सुखरुप असून अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. यावेळी अकोट पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी परिश्रम घ्यावे लागले.

अकोल्यात धावत्या कारने घेतला पेट

By

Published : Nov 20, 2019, 11:35 PM IST

अकोला -शहरातील अकोट फाइल या पुलावरून धावत्या कारने बुधवारी (आज) रात्री 9 वाजता अचानक पेट घेतला. यामुळे रस्त्यावर असलेल्या वाहनचालकांची एकच धांदल उडाली. दरम्यान, कारमधील प्रवासी सुखरुप असून अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. यावेळी अकोट पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी परिश्रम घ्यावे लागले.

अकोल्यात धावत्या कारने घेतला पेट

हेही वाचा - आजपासून इफ्फीची सुरूवात, अमिताभ बच्चनसह रजनीकांत राहणार उपस्थित

अकोला शहरामधून जात असलेली मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार (क्रमांक एमएच- 15 सिटी- 1379) अकोट फाईलच्या पुलावर कारने अचानक पेट घेतला. त्यानंतर मोठा स्फोट झाला. कारमध्ये असलेले चालक व इतर हे पेटत्या कारमधून सुखरूप बाहेर पडले. कारला आग लागल्याची माहिती अकोट फाईल पोलिसांना मिळाली असता, त्यांनी घटनास्थळी येऊन वाहतूक सुरळीत केली. तसेच आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. ही आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. कार कोणाची होती आणि आग कशामुळे लागली? याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

हेही वाचा - नागपूरच्या रेस्टॉरेंटमध्ये ५ लाखांचा वेटर रोबोट

ABOUT THE AUTHOR

...view details