अकोला- रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात राज्य परिवहन महामंडळाची बस पडल्याची घटना दहिगाव फाट्याजवळ रविवारी रात्री घडली. सुदैवाने या अपघातात एकही प्रवाशी जखमी झाला नाही. मात्र, या अपघातानंतर दुतर्फा वाहतुकीची कोंडी झाली होती.
रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात बस गेली; सुदैवाने जीवितहानी नाही - अकोला बस दुर्घटना
रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात राज्य परिवहन महामंडळाची बस पडल्याची घटना दहिगाव फाट्याजवळ रविवारी रात्री घडली. सुदैवाने या अपघातात एकही प्रवाशी जखमी झाला नाही.
![रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात बस गेली; सुदैवाने जीवितहानी नाही](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4242946-thumbnail-3x2-bus.jpg)
राज्य मार्गाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डे झाले असून वाहनचालक खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात वाहन चालवीत राहतात. यामुळे वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटते. असाच प्रकार तेल्हारा आगाराच्या बसचा झाल्याचे समजते. तेल्हारा ते अकोला धावणारी बस क्रमांक एमएच 40 - वय - 5272 ही दहीगाव फाट्याजवळ आली. रस्त्यावरुन जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस कडेला असलेल्या खड्यात गेली. यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र या अपघातामुळे दुतर्फा वाहतुकीची कोंडी झाली होती.
रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने आधीच वाहन चालविणे कठीण झाले आहे. त्यात अशा खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊनच वाहन चालवावे लागत आहे.