महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

MLA Nitin Deshmukh Get Death Threat : आमदार नितीन देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी; म्हणाले, 'नारायण राणे....' - MLA Nitin Deshmukh Akola

उद्धव ठाकरे गटाचे अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांना एका अनोळखी नंबरवरून जीवे ठार मारण्याची धमकी आली आहे. आमदार नितीन देशमुख यांनी माध्यमांसोबत संवाद साधत मिळालेल्या धमकीबद्दल माहिती दिली. मला आलेला फोन हा नारायण राणे व नितेश राणे यांच्या नावाने आल्याचा संशय व्यक्त केला आहे.

MLA Nitin Deshmukh
नितीन देशमुख

By

Published : Feb 5, 2023, 5:24 PM IST

Updated : Feb 5, 2023, 5:35 PM IST

आमदार नितीन देशमुख माध्यमांसोबत संवाद साधताना

अकोला : आमदार नितीन देशमुख यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला असल्याचे त्यांनी आज माध्यमांना सांगितले. हा फोन नितेश राणे, नारायण राणे यांच्या नावाने आला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दोन जणांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, या संदर्भामध्ये पोलीस तक्रार केली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. परंतु, या धमकीच्या फोनमुळे जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये व पदाधिकाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. आमदार देशमुख यांनी मंगळवारी नरिमन पॉईंट येथे येतो हिम्मत असेल तर या असे, आव्हानच धमकी देणाऱ्यांना दिले आहे.

काय म्हणाले आमदार देशमुख ? :माध्यमांसोबत संवाद साधताना आमदार नितीन देशमुख म्हणाले की,आज सकाळी दोन वेगळ्या वेगळ्या मोबाइल नंबरवरून मला फोन आले. त्यातील एक नंबर माझ्याकडे सेव्ह पण आहे. त्यांनी मारण्याची धमकी दिली. नारायण राणे यांनी आतापर्यंत मुंबईत अनेक असे अनेक लोकांना मारून समुद्रात फेकून दिले. त्यांचा आतापर्यंत ठावठिकाणा लागला नाही. त्यांच्या कुटुंबाला सुद्धा त्याचा ठाव ठिकाणा लागला नाही. त्याचे ते वक्तव्य ऐकले आणि त्याला मी म्हटले की, ठीक आहे, कुठे यायचे ते सांगा मी सुद्धा मुंबईला येतो. तर त्यांनी तुम्ही मुंबईला या आम्ही तुमचाही सुद्धा तसा समाचार घेऊ आणि तुम्हाला सुद्धा त्याच पद्धतीने मारु, अशी माहिती त्यांनी दिली आहे.



आमदार देशमुख यांनी दिले आव्हान :ते पुढे म्हणाले की,मी त्याला सांगितले की, मी तुमचं आव्हान स्वीकारून मी मंगळवारी मुंबईला येतो. नरिमन पॉईंटवर मी तुमची 8 ते 10 वाट पाहतो. तुम्ही या, नारायण राणे या, रितेश राणे यांनी या सगळ्यांनी या. मी तिथे तुम्हा सर्वांची वाट पाहतो. आणि त्यासाठी मी उद्या संध्याकाळी मुंबईला रवाना होणार असल्याची त्यांनी माहिती दिली आहे.

नारायण राणेंवर गुन्हा दाखल करा : आमदार देशमुख म्हणाले की, परंतु, माझे एक राणेंच्या ज्या लोकांनी ज्या पद्धतीने धमकीत म्हटले तर अनेक लोकांना मारून समुद्रात फेकले त्याचा ठाव ठिकाणा लागला नाही. पोलिसांना विनंती आहे की, ज्या लोकांना आतापर्यंत मर्डर झाले यांचा शोध लागला नाही की त्यांचे आरोपी आतापर्यंत सापडले नाही. आतापर्यंत जेवढ्या अशा केसेस झाल्या तेवढ्यांचा नारायण राणेंवर 302 चा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मी विनंती करतो.


मात्र पोलिस तक्रार केलेली नाही : आमदार नितीन देशमुख यांनी याप्रकरणी कुठल्याही प्रकारची पोलीस तक्रार केली नाही. मी पोलीस तक्रार करणार नाही, असेही त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे आमदार नितीन देशमुख यांच्यासोबत शेकडो शिवसैनिक जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आमदार नितीन देशमुख यांना धमकी देणारे कोण आहेत याचा अद्याप पत्ता लागलेला नसला तरी या धमकीमुळे मात्र आमदार नितीन देशमुख आणि नारायण राणे, नितेश राणे यांच्यामध्ये वादाची ठिणगी उडाली आहे, हे मात्र निश्चित आहे.
हेही वाचा :K Chandrashekar Rao in Nanded : के. चंद्रशेखर राव यांची सभा उधळून लावण्याचा प्रयत्न, मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Last Updated : Feb 5, 2023, 5:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details