अकोला - अमरावती शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये काही उमेदवारांनी शिक्षकांना आमिष दिले. शिक्षक संघटनेच्या निवडणुकीत राजकीय पक्षांचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे स्वतंत्र असणाऱ्या शिक्षक संघटनेच्या निवडणुकीला राजकीय रंग प्राप्त झाला आहे. याबाबत डॉ. आनंद काळे, संजय खडतकार, देवेंद्र गावंडे, प्रदीप थोरात या शिक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया इटीव्ही भारतशी व्यक्त केला.
निवडणुकीला राजकीय रंग प्राप्त झाल्यामुळे शिक्षकांची प्रतिमा बदनाम-
अमरावती शिक्षक मतदारसंघांमध्ये 27 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. 36 हजार मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. परंतु, या निवडणुकीला आमिष आणि राजकीय रंग प्राप्त झाल्यामुळे शिक्षकांची प्रतिमा बदनाम झाली आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्याचे उपदेश देणारे शिक्षक या निवडणुकीमध्ये भ्रष्टाचाराला समर्थन करीत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.