महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विजयी रॅलीत घुसला टँकर; युवकाचा मृत्यू, चारचाकीलाही धडक - अकोला बातमी

देगाव जिल्हा परिषद गटात भारिप बहुजन महासंघाचे उमेदवार राम गव्हाणकर हे विजयी झाले. त्यानिमित्त विजयी रॅली निमकर्दा येथे काढण्यात आली. यावेळी भरधाव आलेला टॅंकर रॅलीत घुसला.

tanker-entered-in-rally-and-hit-car-and-man
tanker-entered-in-rally-and-hit-car-and-man

By

Published : Jan 10, 2020, 9:22 AM IST

अकोला- देगाव जिल्हा परिषद गटात विजयी झालेल्या राम गव्हाणकर यांच्या विजयी रॅलीत टँकर घुसला. यात एका युवकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. राहुल अभिमन्यू इंगळे असे मृत युवकाचे नाव आहे.

हेही वाचा-दप्तरातील वस्तूबद्दल विचारणा करत शिक्षकाची विद्यार्थीनीला बेदम मारहाण

देगाव जिल्हा परिषद गटात भारिप बहुजन महासंघाचे उमेदवार राम गव्हाणकर हे विजयी झाले. त्यानिमित्त विजयी रॅली निमकर्दा येथे काढण्यात आली. यावेळी भरधाव आलेला टॅंकर रॅलीत घुसला. यात राहुल इंगळे हा युवक गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या टँकरने समोरून येत असलेल्या कारलाही धडक दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details