महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घरकुल लाभार्थी यादीमध्ये घोळ करणाऱ्यांवर कारवाई करा; लाभार्थ्यांचे अकोला जिल्हा परिषदेसमोर उपोषण

पातुर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या नवेगाव येथे शबरी आवास योजनेच्या पी डब्ल्यू एल प्रतिक्षा यादीनुसार अनुक्रमाने लाभार्थींची निवड करण्यात आलेले नाही. यासंदर्भात या लाभार्थ्यांनी पातुर पंचायत गटविकासअधिकारी, सभापती यांना निवेदन दिले होते. परंतु, त्यांच्याकडून योग्य ती कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे ही या संदर्भात तक्रार दिली. परंतु, या तक्रारीवर ही त्यांनी कुठलीच कारवाई न केल्यामुळे या लाभार्थ्यांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला सुरुवात केली आहे.

Akola Zilla Parishad, अकोला जिल्हा परिषद, घरकुल यादीत घोटाळा
Akola Zilla Parishad

By

Published : Mar 30, 2021, 7:11 PM IST

अकोला- पातुर तालुक्यातील नवेगाव येथील शबरी आवास योजनेमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या यादीमध्ये घोळ करण्यात आलेला आहे. अनुक्रमानुसार लाभार्थ्यांची निवड न करता वेगवेगळ्या पद्धतीने लाभार्थ्यांना लाभ दिल्या जात असल्याच्या कारणावरून नवेगाव येथील लाभार्थ्यांनी जिल्हा परिषदेसमोर आज उपोषण केले. भर उन्हामध्ये हे उपोषण करण्यात आले.

पातुर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या नवेगाव येथे शबरी आवास योजनेच्या पी डब्ल्यू एल प्रतिक्षा यादीनुसार अनुक्रमाने लाभार्थींची निवड करण्यात आलेले नाही. यासंदर्भात या लाभार्थ्यांनी पातुर पंचायत गटविकासअधिकारी, सभापती यांना निवेदन दिले होते. परंतु, त्यांच्याकडून योग्य ती कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे ही या संदर्भात तक्रार दिली. परंतु, या तक्रारीवर ही त्यांनी कुठलीच कारवाई न केल्यामुळे या लाभार्थ्यांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला सुरुवात केली आहे.

घरकुल लाभार्थी यादीमध्ये घोळ करणाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी लाभार्थ्यांचे अकोला जिल्हा परिषदेसमोर उपोषण...
उपोषणकर्त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांना दिलेल्या निवेदनामध्ये शबरी आवास योजनेचे पी डब्ल्यू एल प्रतीक्षा यादीनुसार लाभार्थी अनुक्रमाने घेतलेले नाहीत. पंचायत समिती सभापती यांच्या नातेवाईकांची निवड करण्यात आलेली आहे. त्यांच्या यादीनुसार अनुक्रमांक 226, 137, 136, 96, 90, 87 असे असून पंचायत समिती सभापती पातुर यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. तसेच निवड झालेल्या लाभार्थ्यांना शबरी आवास योजनेचा लाभ द्यावा, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. या आंदोलनामध्ये लक्ष्मण गिरे, गजानन भोकरे, वसंता ससाने यांच्यासह आदी सहभागी झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details