अकोला - पातूर तालुक्यातील पाडसिंगी गावात 50 वर्षीय शेतकऱ्याने भावाच्या घरात आज सकाळी गळफास लावून आत्महत्या केली. शांताराम चिंकाजी गवई असे मृत शेतकऱ्यांचे नाव आहे.
अकोल्यात शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या - shantaram Gavai
शांताराम गवई यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांनी आज सकाळी गळफास लावून आत्महत्या केली.
प्रतिकात्मक छायाचित्र
शांताराम यांची आर्थिक परिस्थिती बिकट होती. त्यांच्यावर सहकारी बँकेचे कर्ज असल्याचे समजते. यंदा पेरणीसाठी पुरेसे पैसे नसल्याने त्यांनी त्यांची 3 एकर शेती पडीत ठेवली होती. आज त्यांचा मोठा भाऊ समाधान गवई हा ढोर चारायला गेला असता त्यांनी घरात कोणी नसल्याची संधी साधून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी, असा परिवार आहे.