अकोला -दहावी - बारावीच्या विद्यार्थ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे गर्दी करत परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. वर्षभर ऑनलाइन शिकविले आहे तर ऑनलाइन परीक्षा (Online Exams) घ्या. तुम्ही वर्षभर ऑनलाइन शिकविता आणि ऑफलाइन परीक्षा घेता, हे योग्य नाही. त्यामुळे परीक्षा रद्द करा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी रेटून धरली आहे.
कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वर्षभर शाळा या ऑनलाइन होत्या. ऑनलाइन शिक्षण प्रक्रियेत ग्रामीण आणि मागासभागातील ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेता आले नाही. त्यामुळे ऑनलाइन आणि ऑफलाईन परीक्षा रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी रेटून धरली. ऑनलाइन शिक्षण दिल्यानंतर ऑफलाईन परीक्षा घेणे योग्य नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नका असे सांगत, दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी करीत विद्यार्थ्यांनी एल्गार पुकारला. संतप्त विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत आपले म्हणणे प्रशासनापर्यंत पोहोचविले.
हेही वाचा-Varsha Gaikwad on Students Agitation : सरकार चर्चेला तयार, विद्यार्थ्यांनी मोर्चे काढू नयेत - वर्षा गायकवाड
परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय
या निर्णयाला विरोध करण्यासाठी दहावी आणि 12 वीचे विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयावर आले होते. 300 च्या वर विद्यार्थी येथे आले होते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकच विद्यार्थी एकतेच्या घोषणा देत परिसर दणाणून गेला होता. शाळा जर ऑफलाईन असत्या तर परीक्षा ऑफलाईन घरण्यास हरकत नाही. मात्र, ऑनलाइन शाळा घेऊन ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांना पटलेला नाही. परिक्षासंदर्भात बैठक घेताना शिक्षण मंत्री ( Education Minister Varsha Gaikwad ) या ऑफलाईन बैठकीला उपस्थित न राहता ऑनलाइन उपस्थित होत्या. ऑफलाइन परीक्षेचा निर्णय ऑनलाइन बैठकीत कसा घेता, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.