महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोल्यात मुलांनी पालेभाज्यांपासून तयार केले रंग

धुलीवंदन चार दिवसांवर येऊन ठेपले आहे. यंदाच्या धुलीवंदनात इको फ्रेंडली रंग खेळण्यासाठी विविध स्तरातून प्रबोधनाचे कार्य सामाजिक संस्थातर्फे करण्यात येत आहे. त्यामुळे धुलीवंदनाच्या दिवशी रासायनिक रंगाचा वापर कमी होऊन हर्बल रंगांनी भर घातली आहे.

पालेभाज्यांपासून रंग तयार करताना मुली

By

Published : Mar 18, 2019, 2:54 PM IST

अकोला - रासायनिक रंगांना दूर करीत हर्बल रंगाची क्रेझ निर्माण झाली आहे. ही क्रेझही आता मागे पडणार असल्याचे दिसून येत आहे. आज सहकार नगरातील शिवस्मारक येथे इको फ्रेंडली रंग कार्यशाळेतून मुलांना पालेभाज्यापासून रंग बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. पालक, बिट, आवळा, बेलापासून मुलांनी रंग तयार करून यंदाची होळी साजरी करण्याचा निर्धार केला.

हा अनोखा उपक्रम डॉ. प्रा. ज्ञानसागर भोकरे यांनी शोधून काढला आहे.

धुलीवंदन चार दिवसांवर येऊन ठेपले आहे. यंदाच्या धुलीवंदनात इको फ्रेंडली रंग खेळण्यासाठी विविध स्तरातून प्रबोधनाचे कार्य सामाजिक संस्थातर्फे करण्यात येत आहे. त्यामुळे धुलीवंदनाच्या दिवशी रासायनिक रंगाचा वापर कमी होऊन हर्बल रंगांनी भर घातली आहे. रंग वापरल्याने शरीराला कुठलीच इजा होत नसल्याने या रंगांना सर्व स्तरातून पसंती मिळत आहे. त्या रंगात सोबत आता पालेभाज्यांपासूनही रंग तयार करण्याचा हा अनोखा उपक्रम डॉ. प्रा. ज्ञानसागर भोकरे यांनी शोधून काढला आहे.

डॉ. प्रा. भोकरे यांनी पालेभाज्यांपासून तयार होणाऱ्या रंगांची एक कार्यशाळा सहकार नगरातील शिव स्मारक समितीतर्फे घेतली. या कार्यशाळेत १५० विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी पालक, आवळा, बिट, बेलापासून लाल, हिरवा, पिवळा, काळा असे रंग बनविले. यासाठी भोकरे यांचे मार्गदर्शन लाभले.

यावेळी पंकज जायले, अमित ठाकरे, मधु जाधव, नगरसेवक मंगेश काळे, डॉ. नितीन गायकवाड, सेवानिवृत्त वनअधिकारी गोविद पांडे, अविनाश पाटील, प्रभाकर रूमाले, चेतन ढोरे, राहुल खंडाळकर, विवेक ठोसर, संजय शेरेकर, प्रमोद ठोसर, नितीन दांदळे, निलेश निकम, शेखर शेळके, विजय जंजळ यांच्यासह आदी उपस्थित होते. यावेळी मुलांनी इको फ्रेंडली धुलीवंदन खेळण्याची शपथ घेतली.

ABOUT THE AUTHOR

...view details