महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Cow Dung Collecting Machine : विद्यार्थ्याने बनवले जनावरांचे शेण गोळा करणारे यंत्र.. पशुपालकांचा त्रास होणार कमी - Cow Dung Machine Made By Student

पशुपालक शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांच्या शेण उचलण्याच्या समस्येवर अकोल्यातील एका बाल वैज्ञानिकाने उपाय शोधून काढला आहे. त्याने हात न लावता शेण गोळा करणारे मशीन ( Cow Dung Collecting Machine ) तयार केले असून, त्याच्या या यंत्राची राष्ट्रीय स्तरावर इन्स्पायर अवॉर्डसाठी ( National Level Inspire Award ) निवड झाली आहे.

विद्यार्थ्याने बनवले शेण गोळा करणारे यंत्र.. जनावरांचे शेण उचलण्याचा पशुपालकांचा त्रास होणार कमी
विद्यार्थ्याने बनवले शेण गोळा करणारे यंत्र.. जनावरांचे शेण उचलण्याचा पशुपालकांचा त्रास होणार कमी

By

Published : Mar 22, 2022, 5:03 PM IST

अकोला : पशुपालक शेतकऱ्यांना त्यांच्या पाळीव जनावरांचे शेण गोळा करताना होणारा त्रास व त्यापासून आरोग्याला असलेला धोका लक्षात घेता, बार्शीटाकळी तालुक्यातील तिवसा येथील जिल्हा परिषद शाळेत आठव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शेण गोळा करणारे यंत्र तयार केले ( Cow Dung Collecting Machine ) आहे. या यंत्राची निवड राष्ट्रीय स्तरावरील इन्स्पायर अवाॅर्ड प्रदर्शनासाठी ( National Level Inspire Award ) झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर निवड होणारे हे अकोला जिल्ह्यातील पहिलेच मॉडेल असल्याचे सांगण्यात येत आहे.

विद्यार्थ्याने बनवले शेण गोळा करणारे यंत्र.. जनावरांचे शेण उचलण्याचा पशुपालकांचा त्रास होणार कमी

हात न लावता शेण गोळा करता येणार

तिवसा येथील संकेत अशोक आठवले ( Sanket Ashok Athwale ) या बालवैज्ञानिकाने त्याच्या शाळेतील विज्ञान शिक्षक सुमेध मनवर यांच्या मार्गदर्शनाखाली हे यंत्र विकसित केले आहे. अत्यंत कमी खर्चात हे यंत्र बनविण्यात आले आहे. लोखंडी पाईप व पत्र्याच्या साहाय्याने बनविलेल्या या यंत्राला चाकेही बसविण्यात आली आहेत. त्यामुळे गुरांच्या गोठ्यात सहजपणे या यंत्राची हालचाल करता येते. शेणाला हात न लावता उभे राहूनच या यंत्रामध्ये शेण गोळा करता येते. तसेच ते गोठ्याबाहेर असलेल्या उकिरड्यापर्यंत वाहून नेणे शक्य होते. या यंत्रामुळे पशुपालकांना शेणाचे टोपले डोक्यावर ठेवून ते उकिरड्यापर्यंत नेण्याचा त्रास वाचतो व पर्यायाने त्यांचे आरोग्य चांगले राहते, असे शिक्षक सुमेध मनवर यांनी सांगितले. राष्ट्रीय स्तरावरील इन्स्पायर अवाॅर्ड प्रदर्शनासाठी संकेत आठवलेने बनविलेल्या काऊ डंग कलेक्ट मशीनची निवड झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच अकोल्यातील मॉडेल सहभागी होत असून, जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहे.

जनावरांचे शेण उचलण्याचा पशुपालकांचा त्रास होणार कमी

ABOUT THE AUTHOR

...view details