अकोला - जवळपास 275 कोरोना रुग्णांचे अंत्यविधी करण्यासाठी त्यांचे मृतदेह स्मशानात पोहचवणाऱ्या रुग्णवाहिका चालक जावेद खान यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. घरात वडिलांचा मृतदेह असतानाही त्यांच्या अंतिम विधीला वेळ असल्याचे पाहून जावेदने कोविड योद्ध्याचे कार्य कायम ठेवले. बुलडाणा जिल्ह्यातील एका पॉझिटिव्ह रुग्णाचा मृतदेह तो स्मशानात घेऊन गेला. घरात पिता शबाजख़ान यांचा मृत्यू झालेला असताना त्यांचा मुलगा कर्तव्य निभावत होता.
घरात वडिलांचा मृतदेह असतानाही रुग्णसेवा कायम, कोविड मृतदेह पोहचवण्यासाठी 'तो' कर्तव्यावर तत्पर - covid warrior news
रुग्णवाहिका चालक जावेद खान यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. घरात वडिलांचा मृतदेह असतानाही त्यांच्या अंतिम विधीला वेळ असल्याचे पाहून जावेदने कोविड योद्ध्याचे कार्य कायम ठेवले.
घरात वडिलांचा मृतदेह असतानाही रुग्णसेवा कायम...कोविड मृत पोहचवण्यासाठी 'तो' कर्तव्यावर तत्पर
रुग्णवाहिकेचा चालक जावेद खान यांच्या वडिलांचा सोमवारी सकाळी आठ वाजता मृत्यू झाला. अंतिम विधीसाठी त्यांची बहीण हैदराबाद येथून येत असून तिला पोहचण्यासाठी (सोमवार )रात्रीचे आठ वाजणार होते. तसेच अंतिम विधीसाठी रात्रीचे नऊ होणार होते. यामुळे मधल्या वेळेत त्याने पॉझिटिव्ह रुग्णाचा मृतदेह स्मशानात पोहचवण्यासाठी रुग्णवाहिकेचे स्टेअरिंग हातात घेतलं, आणि तो आपले कर्तव्य पार पाडत राहीला.