अकोला - फळ पीक विम्याच्या दाव्याची अत्यल्प रक्कम मंजूर झाल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी, कृषी अधीक्षक यांना निवेदनही देण्यात आले. दरम्यान शासनाने शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी. अशी मागणीही यावेळी निवेदनातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या पीक विमा मागण्यांसाठी स्वाभिमानीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
केळी उत्पादक शेतकऱ्यांनी सर्वेक्षण करुन नुकसान भरपाईची मागणी केली होती. त्यानंतर महसूल आणि संबंधित विमा कंपनीकडून सर्वेक्षण करण्यात आले. पंचनामानुसार अहवाल तयार करण्यात आला. मात्र, मंजूर रक्कम अत्यल्प असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. हीच बाबीवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत निवेदन दिले.
जिल्हाधिकारी निवेदन