महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बालकांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर सुरू करा - बच्चू कडू - अकोला कोरोना अपडेट

बालकांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर सुरू करा, अशा सूचना पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिल्या. ते कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत आढावा बैठकीत बोलत होते.

Start separate covid Center for children said  Bachchu Kadu in akola
बालकांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर सुरू करा - बच्चू कडू

By

Published : May 13, 2021, 10:33 PM IST

अकोला -कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये बालकांना संसर्ग होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ही बाब लक्षात घेता बालकांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर तयार करावे. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. खरीप हंगामात पेरणीच्या कामानिमित्त शेतीकामाची लगबग वाढेल, अशा परिस्थितीत कोविड-19चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण भागाकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज यंत्रणेला दिले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार अमोल मिटकरी, आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त निमा अरोरा, उपविभागीय अधिकारी मोनिका राऊत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभीये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, माता बाल संगोपण अधिकारी डॉ. मनिष शर्मा, वैद्यकीय महाविद्यालयाचे उपधिष्ठाता डॉ. घोरपडे, डॉ. अष्टपुत्रे, डॉ. सिरसाम, उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार आदि उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री बच्चू कडू यांनी कोरोना रुग्ण स्थिती, रुग्णांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा याबाबत माहिती घेतली. जिल्ह्यातील कोविड रुग्णाची संख्या वाढत असून वाढत्या रुग्णांकरीता बेड, ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढवावी. यावेळी ऑक्सिजन उपलब्धता, आवश्यक मागणी याबाबत माहिती सादर करण्यात आली. आगामी काळात तिसऱ्या लाटेत ग्रामीण भागात व बालकांना बाधीत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ही बाब लक्षात घेता बालकांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर तयार करावे, असे निर्देश पालक मंत्र्यांनी दिले आहेत.

जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेबाबत आढावा घेऊन दुसरा डोस घेण्याऱ्या व्यक्तीना प्राधान्य द्यावे. लसीकरण केंद्रावर आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात. केंद्रावर अनावश्यक गर्दी होणार नाही याकरिता उपायोजना कराव्यात. ग्रामीण भागातील नागरिकांना लसीकरणाकरीता जनजागृती करून लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे, असेही निर्देश यावेळी त्यांनी दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details