अकोला -आधीच नैसर्गिक आपत्तीत त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा ही मिळाला नाही. त्यात दरवर्षी सोयाबीन बियाणे पिकविल्यानंतर त्यातून उत्पन्न मिळत नसल्याची शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. अशातच तेल्हारा येथील गणेश कृषी सेवा केंद्र चालकाने शेतकऱ्यांना सोयाबीनचे बियाण्यांचे पोते देताना त्या पोत्यांवर 'सदर बियाणे हे मी माझ्या जबाबदारीवर नेत आहे. तसेच याची उगवण क्षमता मी पेरणी करण्यापूर्वी तपासून घेईल'. असे शिक्के मारून दिल्या जात असल्यामुळे शेतकर्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, यासंदर्भात शेतकरी आता संभ्रमावस्थेत आहेत. मात्र, याबाबत संबंधित कृषी सेवा केंद्र चालकाविरोधात कृषी अधीक्षक कार्यालयाकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहेत.
बियाणे उगवत नसल्यामुळे शेतकरी हतबल -
निसर्गाच्या कचाट्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. बऱ्याच वेळा बियाणे उगवत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामध्ये अनेक वेळा बियाणे खराब असल्याचे समोर येते. तर बऱ्याच वेळा खत निकृष्ट दर्जामुळे असल्याने शेतकऱ्यांची पिके खराब होतात. हजारो रुपये खर्च करून शेतात पीक उभे करताना शेतकरी हा पुरता कर्जाच्या डोंगरात बुडलेला असतो. घाम गाळून त्याच्या पिकाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे तो पुरता हतबल होऊन जातो. अशा नानाविध संकटात शेतकरी तरीही शेती करतो.
शेतकऱ्यांमध्ये संभ्रम -
अशा परिस्थितीत जगत असताना कृषी सेवा केंद्र चालक मात्र शेतकऱ्यांना संभ्रमावस्थेत टाकत आहेत. तेल्हारा येथील गणेश कृषी सेवा केंद्र चालकाने अजबच प्रकार केला आहे. या कृषी सेवा चालकाने शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे देताना त्या बिलावर आणि त्या पोत्यावर शिक्के मारले आहेत. 'सदर बियाणे हे मी माझ्या जबाबदारीवर नेत आहे. तसेच याची उगवण क्षमता मी पेरणी करण्यापूर्वी तपासून घेईल'. असे नमूद केले आहे. या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
अद्याप कृषी सेवा केंद्र चालकाला कुठल्याही प्रकारची नोटीस नाही -