अकोला- खदान पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मलकापूर परिसरातील साई रेसिडेन्सीमध्ये सेक्स रॅकेट सुरू होते. याठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने गुरुवारी 17 जून रोजी सायंकाळी छापा टाकला. याप्रकरणी पीडित महिलांसह पाच आरोपींविरोधात खदान पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मलकापूर परिसरातील सेक्स रॅकेटवर विशेष पथकाचा छापा; 5 जणांविरूद्ध गुन्हा दाखल - मलकापूर सेक्स रॅकेट न्यूज
मलकापूर परिसरातील साई रेसिडेन्सीमध्ये सेक्स रॅकेट सुरू होते. याठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने गुरुवारी 17 जून रोजी सायंकाळी छापा टाकला. याप्रकरणी पीडित महिलांसह पाच आरोपींविरोधात खदान पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मलकापूर परिसरातील त्रस्त नागरिकांनी पोलिसांना परिसरात अवैध देहविक्री व्यापार चालतो, अशी तक्रार केली होती. त्यामुळे पोलीस अधिक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या पथकाने मलकापुर परिसरातिल 3 मजली इमारत साई रेसिडेन्सीमधील रूम नं 204 मध्ये बनावट ग्राहक पाठवून याप्रकरणाची खात्री केली. तेथे घरमालक व एक घरमालकिन यांनी दोन तरुण मुलींना पैशाचे आमिष दाखवून देहविक्री करण्यासाठी आणले होते. त्यात घरमालक महिलाही एका मुलीचे एका तासाचे 1000 रुपये व एका रात्रीचे 2000 रुपये मोबदला घेवून त्यातील मुलींना काही रुपये देवुन कुंटनखाना चालवित असल्याचे दिसून आले. त्यावरून विशेष पथकाने छापा मारला. छापेमारीदरम्यान, कुंटनखाना चालविणारी महिला, देहविक्री करणाऱ्या 2 मुली आढळल्या. तर कारवाई दरम्यान एक ग्राहक पळून जाण्यास यशस्वी झाला.
यावेळी पोलिसांनी या तिन महिलांजवळून 4510 रुपये, 50 हजार रुपये किमतीची एक दुचाकी, 30 हजार रुपयांचे 2 मोबाइलसह एकूण 85 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी कुंटनखाना चालविणारा उमेश दिनकर म्हस्के रा. कौळखेड अकोला , शुभम खांडेकर रा. अकोला व 3 महिलांविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम कलम 3, 4, 5, 9 नुसार खदान पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.