अकोला- पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने ऑनलाईन मटका जुगारावर छापा टाकून 12 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तीन लाख 79 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या सर्वांवर सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऑनलाइन मटका जुगारावर विशेष पथकाचा छापा; पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त - akola police news
पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने ऑनलाईन मटका जुगारावर छापा टाकून 12 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तीन लाख 79 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे
हेही वाचा -अंडरवर्ल्डमधील मांडवली बादशहा सलीम महाराजला अटक
पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथक हे शहरात गस्त घालत असताना त्यांना माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत विट्ठलनगर मोठी उमरीच्या गुडधी रोडवर असलेल्या कॉम्पलेक्समधे फन टार्गेट या ऑनलाईन अॅपवर कॅम्पुटरवर काही जण हे पैशाचे हारजीतचा खेळ खेळत होते. विशेष पथकातील प्रमुख अधिकारी व कर्मचारी यांनी छापा टाकला. त्यामध्ये जीवन शामराव डिगे, नितेश सहदेव हिरळकर, भास्कर रामभाउ अंजणकर, दिपक संतोष सरोशे, सौरभ राज, सागर भिमराव इंगोले, अजय डिगांबर सरडकर, विजय उत्तम चव्हाण, निलेश दादाराव नावकार, नारायण रामदास कपले, प्रमोद काशीराम शिरसाठ, संतोष सुरेश इंगळे यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून नगदी, मोबाईल, मोटरसाकयल, अॅटो, दोन कॅम्पुटर, जुगार उपयोगी साहित्य असा एकुण तीन लाख 79 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.