महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोल्यात परतीच्या पावसाचा सोयाबीन पिकाला फटका, कवडीमोल भावात होतेय विक्री

खराब झालेल्या सोयाबीनमुळे शेतकरी चिंतीत.. सर्वांना अन्न पुरविणारा बळीराजा आर्थिक संकटात सापडल्याने शासनाने मदत करण्याची मागणी..

अकोल्यात परतीच्या पावसाचा सोयाबीन पिकाला फटका

By

Published : Nov 11, 2019, 5:32 PM IST

अकोला -राज्यात झालेल्या परतीच्या पावसाचा शेतीवर विपरीत परिणाम झाला आहे. परतीच्या पावसामुळे खराब झालेले सोयाबीन अकोल्यातील शेतकऱ्यांनी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाफेड केंद्रावर आणून टाकले आहे. सोयाबीनला असलेल्या हमीभावापेक्षाही अर्ध्या भावात पीक विकण्यास शेतकरी तयार झाला आहे. यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांला शासनाकडून आता मदतीची अपेक्षा आहे.

अकोल्यात परतीच्या पावसाचा सोयाबीन पिकाला फटका

हेही वाचा...दिवाळीतही वाहन उद्योगावर मंदीचा प्रभाव; ऑक्टोबरमध्ये विक्रीत १२.७६ टक्के घसरण

दिवाळीनंतर झालेल्या परतीच्या पावसामुळे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलेच नुकसान सहन करावे लागत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चांगले उत्पन्न मिळण्याच्या आशेवर सोयाबीन, कपाशी, ज्वारी व बाजरी या पिकांची पेरणी केली होती. परिणामी परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये सोयाबीन, ज्वारी व कापूस या पिकाची काढणी करीत असतानाच धो-धो पाऊस पडला. काढणीला आलेले पीक शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर ओले होऊन खराब झाले. खराब झालेले सोयाबीन विकायचे कुठे? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला होता. शेतकऱ्यांनी अकोला शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आपले खराब झालेले सोयाबीन आणले. यानंतर पेरणी करत असताना आलेला खर्च वजा करता काहीच उत्पन्न न मिळवता खराब झालेले सोयाबीन शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अतिशय कमी भावांमध्ये विकत आहे.

हेही वाचा... हैदराबादच्या काचीगुडा स्थानकाजवळ 'करनूल इंटरसिटी'ची एमएमटीएसला धडक; 10 प्रवासी गंभीर

शेतकरी बाजार समितीमध्ये या वर्षी 1500 ते 2000 रुपये प्रति क्विंटल भावाने खराब झालेले सोयाबीन विकत आहेत. नाफेड येथे सोयाबीनचा हमीभाव चांगला 3700 पर्यंत आहे, परंतु हा भाव नाफेडचा चांगल्या प्रतिच्या सोयाबीनसाठी आहे. यामुळे खराब सोयाबीनला काहीच भाव मिळत नसल्याचे पहायला मिळत आहे. खराब झालेल्या सोयाबीनमुळे यावर्षी शेतकरी बहाल झाला असून शासन या शेतकऱ्यांना मदत करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details