महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोल्यात पेरण्या खोळंबल्या, केवळ नऊ टक्केच क्षेत्रावर पेरणी; शेतकऱ्यांना अजूनही दमदार पावसाची वाट - अकोल्यात पाऊस नाही

यावर्षी राज्यात वेळीपूर्वीच मॉन्सूनचे आगमन झाले. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या भागात मॉन्सूनने प्रगती केली. त्यानंतर मात्र मॉन्सूनची आगेकूच थांबली. परिणामी जून महिना अर्ध संपल्यानंतर सुद्धा अद्याप अकोला जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला नाही. त्यामुळे खरीप पेरण्यासुद्धा खोळंबल्या आहेत.

rain
rain

By

Published : Jun 27, 2021, 12:18 PM IST

अकोला- जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पावसात शेतकऱ्यांनी केली आहे. ही पेरणी नऊ टक्केच झाली आहे. परंतु, अजूनही शेतकऱ्यांना दमदार पेरणी योग्य पावसाची वाट आहे. अकोला जिल्ह्यात आतापर्यंत एकूण क्षेत्राच्या केवळ 47 हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली आहे. त्यामध्ये कपाशी व सोयाबीन पिकांचा समावेश आहे. पेरणी करण्यात आलेले क्षेत्र एकूण प्रस्तावित क्षेत्राच्या तुलनेत केवळ 9 टक्के आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.

अकोल्यात पेरण्या खोळंबल्या, केवळ नऊ टक्केच क्षेत्रावर पेरणी..

यावर्षी राज्यात वेळीपूर्वीच मॉन्सूनचे आगमन झाले. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या भागात मॉन्सूनने प्रगती केली. त्यानंतर मात्र मॉन्सूनची आगेकूच थांबली. परिणामी जून महिना अर्ध संपल्यानंतर सुद्धा अद्याप जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला नाही. त्यामुळे खरीप पेरण्यासुद्धा खोळंबल्या आहेत. असे असले तरी काही शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था असल्याने त्यांनी पेरणीचा मुहूर्त साधला आहे. त्यामध्ये अकोट, पातूर व तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. या तालुक्यांसह काही क्षेत्रामध्ये पाऊस झाल्याने आतापर्यंत जिल्ह्यात केवळ 47 हजार हेक्टरवर पेरणी आटोपली आहे. जिल्ह्यात एकूण क्षेत्र हे 4 लाख 83 हजार असून या क्षेत्रापैकी केवळ 9 टक्के पेरणी जिल्ह्यात आटोपली आहे. त्यामुळे अजूनही 90 टक्के पेरणी जिल्ह्यात बाकी आहे. असे असले तरी अद्याप कोरडवाहू क्षेत्रात खरीप पेरणी करण्यासाठी दमदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी चांगला पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी मुरली इंगळे यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details