अकोला -बोरगाव मंजू पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या डोंगरगाव येथे घरगुती कारणावरून मुलानेच बापाचा खून केल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. पोलिसांनी मुलाविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. अर्जुन सहारे असे मृतक बापाचे नाव आहे. अनिल सहारे असे वडिलांना मारणाऱ्या मुलाचे नाव आहे.
डोंगरगाव येथील अर्जुन उकर्डा सहारे व त्यांचा मुलगा अनिल उकर्डा सहारे या बापलेकाचे सोमवारी रात्री शुल्लक कारणावरून भांडणं झाले. या दोघांच्या भाडंनात मुलगा अनिल याने रागाच्या भरात आपल्या जन्मदात्या बापाला काठीने मारहाण केली. या मारहाणीत पिता अर्जुन सहारे हे गंभीर जखमी होऊन त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला.
आरोपी मुलास पोलिसांनी केली अटक-
घटनेची माहिती मिळताच ठाणेदार सुनील सोळंके, पोलीस उप-निरीक्षक विना पंडेसह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. दरम्यान, राजेश नेवारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुलगा अनिल सहारे याच्याविरुद्ध भारतीय दंड खुनाचा गुन्हा 302 दाखल करून आरोपी मुलास पोलिसांनी अटक केली. दरम्यान, या दोघांतील भांडणाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी मुलास न्यायालयात हजर केले होते. पुढील तपास ठाणेदार सुनील सोळंके करत आहेत.
हेही वाचा-आम्ही फक्त दोन दिवसांच्या टाळेबंदीला सहमती दर्शवली होती - फडणवीस