अकोला- आधीच्या राज्यकर्त्यांनी सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग राबविला नाही. एका विशिष्ट समुहाने राज्यात शासन केल्यामुळे सोशल इंजिनियरिंग मागे पडले. राज्यात सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग भारिप-बहुजन महासंघाने उभा केला आहे. भारिप बहुजन महासंघाचा पायाच सोशल इंजिनिअरिंग आहे. याच आधारावर वंचित बहुजन आघाडी काम करणार आहे. त्यामुळे राज्यभरात वंचित बहुजन आघाडीचा पाया विविध समाजांच्या खांद्यावर उभा राहणार असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष राजेंद्र महाडोळे यांनी बुधवारी व्यक्त केले.
'वंचितां'ना न्याय देण्यासाठी सोशल इंजिनिअरिंग शिवाय पर्याय नाही' - wanchit aaghadi
राज्यात सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग भारिप-बहुजन महासंघाने उभा केला आहे. भारिप बहुजन महासंघाचा पायाच सोशल इंजिनिअरिंग आहे. त्यामुळे राज्यभरात वंचित बहुजन आघाडीचा पाया विविध समाजाच्या खांद्यावर उभा राहणार असल्याचे मत, वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष राजेंद्र महाडोळे यांनी बुधवारी व्यक्त केले.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वंचित बहुजन आघाडीची जिल्हा व युवा कार्यकारणी जाहीर करण्यासाठी ते अकोल्यात डेरेदाखल झाले होते. पुढे ते म्हणाले, वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यभर उभे केले आहे. या आघाडीमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्या सर्वांना न्याय देण्यासाठी सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग आघाडीमध्ये करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. त्यादृष्टीनेच राज्यभरात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकारणी जाहीर करण्यात येत आहे.
वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघ या दोघांमध्ये अॅड. प्रकाश आंबेडकर हे समन्वयक म्हणून राहणार आहेत. या दोघांनाही प्राथमिकता राहणार आहे, असे म्हणत एमआयएममध्ये काम करणारा मुस्लीम हा एमआयएममध्ये काम करेन. हा त्याचा त्याचा प्रश्न असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष राजेंद्र महाडोळे यांनी सांगितले. जिल्हा कार्यकारिणीच्या जिल्हाध्यक्षपदी प्रमोद देंडवे यांची तर युवक जिल्हाध्यक्षपदी सागर कढोणे यांची निवड केली असल्याचे सांगून इतरही निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांची नावे त्यांनी जाहीर केली. या पत्रकार परिषदेत भारिपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखेडे, ज्ञानेश्वर सुलताने, दिपक गवई, प्रा. डॉ. प्रसन्नजित गवई यांच्यासह आदी उपस्थित होते.