महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोल्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ; सहा नवे रुग्ण तर एकाचा मृत्यू

शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आज सहाने वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण आकडा आता 38 वर पोहोचला आहे.

six more tested positive for corona in Akola
अकोल्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ; सहा नवे रुग्ण तर एकाचा मृत्यू

By

Published : May 2, 2020, 12:20 PM IST

अकोला- शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आज सहाने वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण आकडा आता 38 वर पोहोचला आहे. तर शुक्रवारी रात्री दाखल झालेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या पाच झाली आहे.

अकोल्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ; सहा नवे रुग्ण तर एकाचा मृत्यू

पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांपैकी एक रुग्ण मोहम्मद अली रोडवरील रहिवासी आहे. तर उर्वरित पाच हे एका मृत बाधित महिलेच्या संपर्कातील आहेत. ते सर्व जण एका खासगी रुग्णालयात काम करतात. त्यात एका डॉक्टरचाही समावेश आहे. मृत महिला शासकीय रुग्णालयात येण्याआधी या दवाखान्यात उपचारासाठी गेली होती.

अकोल्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ; सहा नवे रुग्ण तर एकाचा मृत्यू

आज प्राप्त अहवाल - ४७
पॉझिटीव्ह- सहा
निगेटीव्ह- ४१

ABOUT THE AUTHOR

...view details