महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संजय गांधी आणि श्रावण बाळ योजनेचा लाभ ज्येष्ठांना द्या - सुनीता श्रीवास - senior citizens

श्रावण बाळ योजना आणि संजय गांधी योजना ज्येष्ठांसाठी लाभदायक आहेत. मात्र, ज्येष्ठांना या योजनांचे लाभ मिळवण्यासाठी आवश्यकते पेक्षा जास्त कागदपत्रे द्यावी लागत आहेत. दलालांच्या माध्यमातून त्यांची लुबाडणूक होत आहे. यामुळे त्यांना या योजनांचा लाभ मिळन्यास विलंब होऊनये म्हणून शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्याना निवेदन दिले.

संजय गांधी आणि श्रावण बाळ योजनेचा लाभ ज्येष्ठांना द्या - सुनीता श्रीवास

By

Published : Jul 23, 2019, 5:21 PM IST

अकोला -ज्येष्ठ नागरिकांना श्रावण बाळ योजना आणि संजय गांधी योजनेचा लाभ मिळत नसल्याने त्यांचे हाल होत आहे. ज्येष्ठांना हे लाभ मिळावेत अशी मागणी शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक सुनिता शिवास यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

संजय गांधी आणि श्रावण बाळ योजनेचा लाभ ज्येष्ठांना द्या - शिवसेनेच्या सुनीता श्रीवास

श्रावण बाळ योजना आणि संजय गांधी योजना ज्येष्ठांसाठी लाभदायक आहेत. मात्र, ज्येष्ठांना या योजनांचे लाभ मिळवण्यासाठी आवश्यकते पेक्षा जास्त कागदपत्रे द्यावी लागत आहेत. दलालांच्या माध्यमातून त्यांची लुबाडणूक होत आहे. यामुळे ज्येष्ठांना लाभ मिळण्यास उशीर होत आहे. त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक कार्यालयांमध्ये ताटकळत बसलेले असतात. जेष्ठ नागरिक या योजनांचा तत्काळ लाभ द्यावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतिने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

यावेळी शिवसेनेचे नगरसेवक राजेश मिश्रा, गजानन चव्हाण, योगेश गीते, रुपेश ढोरे, योगेश कनचनपुरे, जिल्हा संघटिका देवश्री ठाकरे, नगरसेविका वैशाली शेळके, सम्पर्क संघटिका वैशाली घोरपडे, जिल्हा उपसंघटिका सुनीता श्रीवास, रेखा राऊत, शुभांगी किणगे यांच्यासह आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details