महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बाळापूर मतदारसंघात नितीन देशमुख यांना सेनेची उमेदवारी; एबी फॉर्मही मिळाला

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांची लातूर तालुक्यात चांगली पकड आहे. ते या तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य असून बाळापुर विधानसभेच्या निवडणुकीसाठी त्यांनी गेल्या पाच वर्षापासून छुप्या पद्धतीने तयारी केली. हा मतदारसंघ शिवसेनेला सुटेल याबाबत पदाधिकाऱ्यांनी चांगला जोर लावला होता.

नितीन देशमुख

By

Published : Sep 30, 2019, 9:00 AM IST

अकोला- बाळापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांची उमेदवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. त्यांना एबी फॉर्मही दिल्याचे फोटो व्हायरल होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाच पैकी दोन विधानसभा मतदारसंघ मागणाऱ्या शिवसेनेने मात्र एकाच जागेवर समाधान मानले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला टक्कर देणाऱ्या शिवसेनेचा विजय होतो का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे

हेही वाचा - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ आज धडाडणार; प्रचाराचा फोडणार नारळ

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांची लातूर तालुक्यात चांगली पकड आहे. ते या तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य असून बाळापुर विधानसभेच्या निवडणुकीसाठी त्यांनी गेल्या पाच वर्षापासून छुप्या पद्धतीने तयारी केली. हा मतदारसंघ शिवसेनेला सुटेल याबाबत पदाधिकाऱ्यांनी चांगला जोर लावला होता. नितीन देशमुख यांनी केलेल्या तयारीच्या जोरावर जिल्हा परिषद सदस्य ज्योत्स्ना चोरे आणि याच मतदारसंघात राहणारे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप यांनीही दावा ठोकला होता. परंतु, या दोघाकडे आकर्षित होतील, असे एकही कर्तव्य त्यांनी या मतदारसंघात बजावले नसल्याचे बोलले जात आहे. नितीन देशमुख यांनी या मतदारसंघात हिंदू मतदारच नव्हे तर बौद्ध आणि मुस्लीम मतदारांची चांगली मोठ बांधली आहे. त्यामुळे या मतदारसंघात 'वंचित'ला टक्कर देणारा जर एखादा उमेदवार असेल तर तो शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख हेच संबोधले जात होते. त्यामुळे या निवडणुकीत भाजप- सेना युती की वंचित बहुजन आघाडी विजयी होते, हे पाहणे मह्त्तवाचे असेल.

हेही वाचा - MAHA VIDHAN SABHA : 'बाबरी'नंतर हिंदूत्वादी राजकारण.. मुंबई बॉम्बस्फोट मालिका अन् मराठवाडा नामांतर आंदोलन

ABOUT THE AUTHOR

...view details