अकोला - स्थायी समितीच्या सभेमध्ये नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांवर अधिकारी व सभापतीकडून योग्य उत्तर न मिळाल्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांनी आज खुर्च्या आणि फाईलची फेकाफेक केली. या गदारोळात सेनेच्या नगरसेवकांनी सभातून सभात्याग केला. दरम्यान, नगरसेवकांने स्थायी समितीच्या सभेमध्ये अधिकारी व सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
शिवसेना नगरसेवकाचा राडा, अकोला पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीतील प्रकार हेही वाचा -VIDEO: अहमदाबाद- जयपूर विमानात शिरलं कबूतर; प्रवाशांची उडाली धांदल
स्थायी समितीची सभा सभापती विनोद मापारी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात सुरू झाली. या सभेमध्ये पहिल्या प्रश्नानंतर दुसऱ्या प्रश्नाचे वाचन नगर सचिव यांनी केले. त्या प्रश्नावर. त्या प्रश्नावर यांनी केले. त्या प्रश्नावर सचिव यांनी केले. त्या प्रश्नावर. त्या प्रश्नावर शिवसेनेचे नगरसेवक मंगेश काळे यांनी आक्षेप घेतला. महानगरात विद्युत साहित्य तसेच एलईडी लाईट मिळत नसल्यामुळे नागरिक वारंवार प्रश्न विचारत आहे. बरेच ठिकाणी शहरात अंधार आहे. हा अंधार दूर करन्यासाठी महापालिकेच्या विद्युत विभागाकडून कुठलाच योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक मंगेश काळे यांनी केला.
विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी असमाधानकारक व उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे सेनेचे नगरसेवक काळे यांनी सभागृहात म्हटले. सभापती मापारी यांनी नगरसेवक काळे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, मंगेश काळे यांनी सभापती विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांची बाजू घेत असल्याचा आरोप असल्याचा आरोप करीत खुर्च्या व फाईल यांची फेकाफेक केली. फेकलेली एक फाईल एका नगरसेविकेला लागत होती. परंतु, त्यांनी स्वतःचा बचाव केल्याने त्या बचावल्या. या प्रकारानंतर सेनेचे नगरसेवक मंगेश काळे यांनी स्थायी समितीच्या सभेत मधून सभात्याग केला.
हेही वाचा -शिक्षिकेशी अरेरावी केल्यावरून संस्था चालकाची विद्यार्थ्यांना स्टंपने मारहाण