महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...म्हणून अकोल्यात सेना नगरसेवकांनी पालिका सभागृहात आणले कोंबडीचे मांस - शिवसेना नगरसेवक अकोला पालिका

उघड्यावर आणि विनापरवाना मांस विक्रीविरोधात शिवसेनेच्या नगरसेवकांनी थेट कोंबडीचे मांस महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आणले.

akola corporation
शिवसेना नगरसेवक अकोला पालिका

By

Published : Feb 4, 2020, 4:51 PM IST

Updated : Feb 4, 2020, 5:45 PM IST

अकोला- उघड्यावर आणि विनापरवाना मांस विक्रीविरोधात शिवसेनेच्या नगरसेवकांनी थेट कोंबडीचे मांस महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आणले. हे मांस घेऊन येणाऱ्या नगरसेवकांना सुरक्षा रक्षकांनी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्यामध्ये वाद देखील झाला. तर, दुसरीकडे विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण आणि माजी महापौर विजय अग्रवाल यांच्यामध्येही शाब्दिक वाद झाला.

अकोल्यात सेना नगरसेवकांनी पालिका सभागृहात आणले कोंबडीचे मांस

हेही वाचा -मुंबईत ई-चालान दंड वसुली ठरतेय वाहतूक पोलिसांसाठी डोकेदुखी

दरम्यान, सर्वच नगरसेवकांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद शांत झाला. महापालिकेची सर्वसाधारण सभा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आज (मंगळवार) दुपारी झाली.

सभेच्या सुरुवातीला शिवसेनेच्या नगरसेवकांनी आंदोलनाचा पवित्रा आजमावत एका पोत्यात कोंबडीचे पंख, मांस आणून सभागृहात महापौर यांच्यासमोर टाकले. शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमनात मांस विक्रेते कोंबडीचे पंख व मांस शहरात विविध वॉर्डात फेकतात. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो, असे आंदोलन करणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी सांगितले. यावरून सुरक्षारक्षक व शिवसेना नगरसेवकांमध्ये चांगलीच धक्काबुक्की झाली. काही नगरसेवकांनी सभा रद्द करून थोड्या वेळाने घ्या, अशी मागणी केली. परंतु, महापौर यांच्या आदेशाने सभा पुन्हा सुरळीत करण्यात आली.

अकोला मनपाची सभा सुरळीत सुरू झाल्यानंतर नगरसेवक विजय अग्रवाल व विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण यांच्यामध्येसुद्धा शाब्दिक बाचाबाची झाली. सभेमधील विषय पहिले घ्या, या कारणावरून बाचाबाची होऊन सभागृह दुमदुमले होते.

शहरांमधील हॉकर्स झोन निश्चित करणेबाबत व विदाउट परमिशन दुकान लावणाऱ्यांवर कारवाई होणार, अतिक्रमण विभागाने त्वरित अतिक्रमण केलेले दुकानं, गरज हे काढून अतिक्रमण कारवाई राबवावी व उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांवर निर्बंध घालावे, असे मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी सांगितले.

Last Updated : Feb 4, 2020, 5:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details