महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

MLC Election Result 2021 : परिवर्तन निसर्गाचा नियम - गोपीकिशन बाजोरिया - भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल विजयी

अकोला-वाशिम-बुलडाणा विधानपरिषदेच्या ( MLC Election Result 2021 ) निवडणुकीमध्ये सेनेचे तथा महाविकास आघाडीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया ( Gopikishan Bajoria ) यांनी निकालाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. विजयी उमेदवाराला शुभेच्छा, अशी प्रतिक्रिया दिली.

गोपीकिशन बाजोरिया
गोपीकिशन बाजोरिया

By

Published : Dec 14, 2021, 3:34 PM IST

Updated : Dec 14, 2021, 5:29 PM IST

अकोला- अकोला-वाशिम-बुलडाणा विधानपरिषदेच्या ( MLC Election Result 2021 ) निवडणुकीमध्ये सेनेचे तथा महाविकास आघाडीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया (Gopikishan Bajoria ) यांचा पराभव भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल ( BJP Candidate Vasant Khandelwal ) यांनी केला आहे. या पराभवानंतर सेनेचे बाजोरिया यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. परिवर्तन निसर्गाचा नियम आहे. ज्या नगरसेवकांनी अठरा वर्ष प्रतिनिधित्व दिले त्यांना परिवर्तन अपेक्षित होते, अशी प्रतिक्रिया सेनेचे पराभूत उमेदवार गोपिकीशन बाजोरिया म्हणाले.

बोलताना गोपीकिशन बाजोरिया

पुढे ते म्हणाले, निवडणुकीमध्ये मतांचे विभाजन होत असते ती निवडणूक विधानपरिषदेचे असो विधानसभेची किंवा लोकसभेची असो हे आयुष्यातील घटक आहे. विजयी उमेदवारांना माझ्या शुभेच्छा. त्यांनी या वयामध्ये सामाजिक कार्याचा वसा घेतला आहे. त्यांना उशीर झाला आहे. त्यांनी जनसामान्यांची आणि जनतेची सेवा करावी, अशी अपेक्षा करतो, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे पराभूत उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांनी दिली आहे.

गोपिकिशन बाजोरिया यांनी चौथ्यांदा निवडणुकीत लढवली होती. यापूर्वी ते तीनवेळा याच मतदार संघातून विजयी झालेले होते. मात्र, यंदा भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांनी त्यांचा 110 मतांनी पराभव केला आहे.

अशी मिळाली मते

अकोल्यातून भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांचा 110 मतांनी विजय झाला आहे. सेनेचे बाजोरिया यांना 331 तर भाजपचे उमेदवार खंडेलवाल याना 441 मते मिळाली आहेत.

अकोला विधान परिषद - मिळालेली मते

Last Updated : Dec 14, 2021, 5:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details