अकोला- इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेने आज दुपारी अकोल्यातील गांधी चौकामध्ये पेट्रोलियम मंत्री धर्मेश प्रधान यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन केला. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकार, पंतप्रधान व पेट्रोलियम मंत्र्यांविरोधात नारेबाजी केली.
अकोल्यात शिवसेनेने जाळला पेट्रोलियम मंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा; इंधन दरवाढीचा केला विरोध
केंद्र सरकारने इंधन दरवाढ ही दररोज सुरू केली आहे. पेट्रोलसोबतच डिझेलचे दर गगनाला पोहोचले आहे. त्यामुळे मालवाहतुकीच्या दरात वाढ झाल्याने खाद्य वस्तूसह इतर वस्तूचे दर कमालीचे वाढले आहेत.
केंद्र सरकारने इंधन दरवाढ ही दररोज सुरू केली आहे. पेट्रोलसोबतच डिझेलचे दर गगनाला पोहोचले आहे. त्यामुळे मालवाहतुकीच्या दरात वाढ झाल्याने खाद्य वस्तूसह इतर वस्तूचे दर कमालीचे वाढले आहेत. केंद्र सरकार कोरोनाच्या काळात महागाई वाढवत असून, सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लावत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ही दरवाढ कमी करावी, या मागणीसाठी शिवसेनेने केंद्रीय पेट्रोलियम मंत्री यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन केला. तसेच केंद्र सरकार, पंतप्रधान व पेट्रोलियम मंत्र्यांविरोधात नारेबाजी केली.
यावेळी शिवसेनेचे नगरसेवक राजेश मिश्रा, नगरसेवक गजानन चव्हाण, अमोल गिते, अश्विन नवले, सतीश चोपडे यांच्यासह सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.