महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोल्यात शिवसेनेचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याविरोधात आंदोलन - राज्यसभा शपथविधी सोहळा बातमी

राज्यसभेत खासदारांच्या शपथविधी सोहळ्यात उदयनराजे भोसलेंनी घेतल्यानतंर 'जय भवानी जय शिवाजी' अशी घोषणा दिली होती. त्यावेळी सभापती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेत त्यांना समज दिली होती. शुक्रवारी अकोल्यातही याचे पडसाद उमटले. जिल्ह्यातील शिवसैनिकांनी बसस्थानक चौकात नायडू यांच्या छायाचित्राला चपला मारून विरोध दर्शवला.

शिवसेनेचे उपराष्ट्रपती यांच्याविरोधात आंदोलन
शिवसेनेचे उपराष्ट्रपती यांच्याविरोधात आंदोलन

By

Published : Jul 24, 2020, 9:52 PM IST

अकोला :राज्यसभेत उदयनराजे भोसले यांच्या शपथविधीनंतर सभापती व्यंकय्या नायडू यांनी केलेल्या विधानाचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. अकोल्यातही शिवसेनेने आज(शुक्रवार) बसस्थानक चौकात नायडू यांच्या विरोधात संताप व्यक्त करत तीव्र घोषणाबाजी केली. यावेळी सेनेचे दोन्ही आमदार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यसभेचे नवनियुक्त खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या शपथविधीवरून राजकीय वातावरण चांगलंच तापू लागले आहे. उदयनराजेंनी शपथ घेताना 'जय भवानी जय शिवाजी' अशी घोषणा दिली होता. शपथेवेळी या घोषणेला सभापती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेत समज दिली होती. याचे पडसाद अकोल्यातही उमटले असून शुक्रवारी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या छायाचित्राला चपला मारून विरोध करण्यात आला. तसेच नारेबाजी करण्यात आली. महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या छायाचित्राला चपला मारून आपला रोष व्यक्त केला. यावेळी मात्र आमदार गोपिकीशन बाजोरिया व आमदार नितीन देशमुख यांच्याकडून सोशल डिस्टनसिंगचे पालनही करण्यात आले नाही. यावेळी रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

या मुद्द्यावरून राज्यभरात तीव्र संतापाची लाट दिसून आली. तर, दुसरीकडे, उपराष्ट्रपतींनी ट्विट करून यावर स्पष्टीकरण दिले. 'मी शिवाजी महाराजांचा निस्सीम प्रशंसक आणि भवानी मातेचा भक्त आहे. मात्र, शपथविधी कार्यक्रमात कोणतीही घोषणा द्यायची नसते. या प्रथेची आठवण सदस्यांना करून दिली. यामध्ये शिवाजी महाराजांचा कोणताही अपमान केला नाही, अशी प्रतिक्रिया व्यंकय्या नायडू यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details