अकोला -कर्नाटक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे विटंबना ( Shivaji Maharaj Statue Defacement ) झाल्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी ( Shiv Sainik ) आज (रविवारी) चांदेकर चौकात ( Chandekar Chowk Akola ) कर्नाटक सरकारचा प्रतिकात्मक पुतळा दहन ( Burning of Symbolic Statue of Karnataka Government ) केला. मात्र पुतळा दहन करण्याआधीच पोलिसांनी ते पुतळे ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शिवसैनिक आणि पोलीस यांच्यामध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले. शेवटी पोलिसांचा विरोध झुगारत शिवसैनिकांनी पुतळ्याचे दहन ( Shiv Sainiks Burnt the Statue ) केले.
कर्नाटक सरकारचा विरोध करण्यासाठी शिवसैनिकांनी चांदेकर भवन येथे निषेध आंदोलन करण्याचे आयोजन केले होते. त्यानंतर शिवसैनिकांनी कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्र्याचे प्रतिकात्मक पुतळा आणला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना मज्जाव केला. यावरून पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये वाद झाला. शेवटी पोलिसांचा विरोध झुगारून शिवसैनिकांनी कर्नाटक सरकारच्या प्रतिकात्मक पुतळा दहन केले. पोलिसांनी जळलेला पुतळा विझविण्यासाठी प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले. आंदोलन संपल्यानंतर पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेतले.