अकोला - केंद्र सरकारने तयार केलेल्या नवीन शेतकरी कायद्याला देशभरात विरोध होत आहे. शेतकरी जागर मंचाव्दारे जिल्ह्यातील 111 गावांमध्ये जाऊन यासंदर्भात विस्तृत चर्चा केली. मेरा गाव मेरी संसद या अभियानामधून शेतकऱ्यांनी या केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याविरोधात नाराजी व्यक्त केली. त्यामुळे शेतकरी जागर मंचने हा कायदा रद्द करावा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज 'शिदोरी खावो' असे अनोखे आंदोलन केले.
कृषी कायद्यासंदर्भात शेतकऱ्यांची मते घेतली जाणून-
शेतकरी जागर मंचने 13 ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील 111 गावांमध्ये नवीन कृषी कायद्यासंदर्भात शेतकऱ्यांची मते जाणून घेतली. त्यानुसार हजारो शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याला विरोध दर्शविला. महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये या कायद्याविरोधात शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. दिल्ली येथे गेल्या महिनाभरात पेक्षा जास्त काळ शेतकरी आंदोलन करीत आहे.