महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोदी लोकशाहीचे तर शाह शांतीचे हत्यारे; अकोल्यात राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप - शब्बीर विद्रोही

भाजप आणि आरएसएस यांच्यासह पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री शाह यांच्यावर आपल्या कवितांनी आणि भाषण शैलीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते शब्बीर विद्रोही यांनी जाहीर सभेत आग ओकली.

शब्बीर अहमद विद्रोही

By

Published : Oct 14, 2019, 4:27 AM IST

Updated : Oct 14, 2019, 7:54 AM IST

अकोला- भाजप आणि आरएसएस यांच्यासह पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री शाह यांच्यावर आपल्या कवितांनी आणि भाषण शैलीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते शब्बीर विद्रोही यांनी जाहीर सभेत जोरदार टीका केली.

मोदी लोकशाहीचे तर शाह शांतीचे हत्यारे

हेही पहा - मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' टीकेला आशिष देशमुखांचे प्रत्युत्तर

जुने शहरातील सोनटक्के प्लॉट येथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार साजिद खान पठाण यांच्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. ते म्हणाले की, 'सबका साथ सबका विकास' बोलनेवाला खोटारडा आहे. तसेच त्यांचा मित्र सर्व धर्माच्या नागरिकांना नागरिकत्व देईल, परंतु मुस्लिमांना देणार नाही, असे म्हणतात. तो मोदींपेक्षा भयंकर आहे. नरेंद्र मोदी यांच्या नावातील शब्दांची फोड करीत त्यांचा अर्थ सांगत ते म्हणाले की, मोदी हे लोकतांत्रिक भारताचे हत्यारे आहेत. तर अमित शाह हे शांतीचे हत्यारे आहे. जेव्हा देशात स्वातंत्र्यासाठी लढा दिला जात होता. तेव्हा आरएसएसवाले ब्रिटीशांची मदत करीत होते. ब्रिटिशांची मुखबिरी करणारे हे आपल्याला राष्ट्रवाद शिकणार का?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

इंडिया गेटवर 64 हजार गावांमधील 36 हजार नावे हे आमचेच आहेत. सीता हरणासाठी मारीच हा सोनेरी हरण बनून गेला होता. हा मारीच म्हणजे मोदी आहे, असा घणाघात आरोप देखील त्यांनी केला. शिवाय मोदी हे गिरगिटा सारखे रंग बदलत असल्याचेही म्हणाले. सापांमध्ये जेवढे विष आहे त्यापेक्षा जास्त विष आरएसएस पसरवत असल्याचा आरोप राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद विद्रोही यांनी केला.

Last Updated : Oct 14, 2019, 7:54 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details