अकोला -अकोट तालुक्यातील एका ट्युशन क्लासच्या शिक्षकाने १६ वर्षीय विद्यार्थिनीवर गेल्या काही दिवसांत अनेकदा अत्याचार केले. पीडित युवतीच्या तक्रारीवरून दहीहंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी यामध्ये दोघांना अटक केली असुन ते सध्या पोलिस कोठडीत आहेत. या दोघानी आदरस्थानी असलेल्या शिक्षकी पेशाला काळीमा फासली आहे. अनिल भालेराव आणि नितीन भालेराव यांना असे अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत.
शिक्षकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार; दोघांना अटक
जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील एका गावातील मुलीवर शिक्षकानी अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपीना अटक करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील एका गावात राहणारी मुलगी दहावीच्या वर्गाला शिकत आहे. तिची ट्युशन वरूळ जऊळका येथे होती. याच ठिकाणी नितीन भालेराव नावाचा शिक्षक शिकवण्यासाठी होता. मागील काही दिवसांत दिवस ट्युशन संपल्यानंतर या प्रकरणातील पीडित मुलीला नितीनने ट्युशन रुमच्या बाजूलाच असलेल्या एका रुममध्ये बोलवून तिच्यावर लैगिंग अत्याचार केले. पीडित मुलीने हा घटनाक्रम आई वडिलांना सांगितला. याबाबत दहिहंडा पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून या शिक्षकाविरुद्ध विनयभंग बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर आरोपी शिक्षकासह अनिल भालेराव याला देखील पोलिसांनी अटक केली.