अकोला- अकोटकडे जाणारी काळीपिवळी जीप गांधीग्राम पुलाजवळ स्टेरिंग लॉक झाल्याने आज सायंकाळी उलटली. या अपघातात 7 ते 8 जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अकोल्यात स्टेअरिंग लॉक झाल्याने जीप उलटली; 8 प्रवासी जखमी - अकोला अपघात
अकोटकडे जाणारी जीप गांधीग्राम पुलाजवळ स्टेरिंग लॉक झाल्याने आज सायंकाळी उलटली. यात सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत.
अकोलाकडून अकोटकडे जाणारी जीपची (क्र. एमएच 28 एच 714) गांधीग्राम जवळील पुलाजवळ स्टेअरिंग लॉक झाली. त्यामुळे चालकाने जीपवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्याने दुसऱ्या बाजूने गाडी वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडी उलटली. त्यामुळे जीपमधील प्रवाशी बाहेर फेकले गेले आणि ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दहीहंडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
दरम्यान, ज्या ठिकाणी ही जीप उलटली, त्या ठिकाणापासून थोड्या अंतरावर पूल होता. त्यावरून जर जीप उलटली असती तर मोठा अनर्थ झाला असता.