महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोल्यात सात नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; एकाचा मृत्यू - अकोला कोरोना म्रृत्यू

अकोल्यात सात नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर उपचारादरम्यान एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 30 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

akola corona update
अकोला कोरोना अपडेट्स

By

Published : May 30, 2020, 1:30 PM IST

अकोला - जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार सात जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर एका 71 वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अकोल्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 30 वर पोहोचली आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या सात रुग्णांत पाच महिलांचा समावेश आहे. हे रुग्ण बाळापूर, आलेगाव पातूर, तसेच रामदासपेठ, शरीफ नगर, राधाकिसन प्लॉट, गायत्री नगर, फिरदौस कॉलनी येथील रहिवासी आहेत.

आज पहाटे एका 71 वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा रुग्ण साईनगर डाबकी रोड येथील रहिवासी होता. त्या रुग्णाला 24 मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आजचे अहवाल-
प्राप्त अहवाल - 49
पॉझिटीव्ह - सात
निगेटीव्ह- 42

जिल्ह्यात सद्यस्थिती -
एकूण पॉझिटिव्ह अहवाल - 565
म्रृत - 30 (29 + 1),
डिस्चार्ज- 388

अॅक्टिव्ह रुग्ण - 147

ABOUT THE AUTHOR

...view details