अकोला- संचारबंदीत कर्तव्य बजावत असताना दोन पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी कोरोनावर विजय मिळवला. दोघांचेही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी सायंकाळी पुष्पगुच्छ देऊन दोघांचे स्वागत केले.
आनंददायी बातमी... अकोल्यातील दोन पोलिसांचा कोरोनावर विजय, अधिकाऱ्यांकडून दोघांचे स्वागत - दोन पोलीस कोरोनामुक्त
दोन पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारानंतर दोन्ही पोलीस कर्मचारी कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
अकोल्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना झाला होता. यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. दोघांच्याही त्यांच्या सर्व तपासण्या निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
कोरोनामुक्त पोलीस कर्मचाऱ्यांचे स्वागत करण्यासाठी एसडीएम डॉ. निलेश अपार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, तहसीलदार विजय लोखंडे, नायब तहसीलदार आत्राम व एमआयडीसी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी त्यांच्यावर पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. तसेच उपस्थित कर्मचाऱ्यांनी टाळी वाजवून त्यांना शुभेच्छा दिल्या.