महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोल्यातील विद्रुपा नदीत वाहून गेलेल्या तरूणाचा शोध अखेर थांबवला

29 जुलै रोजी भोकर येथील विद्रुपा नदीच्या पुरात वाहून गेलेल्या नितीन दामोदर या तरुणाचा शोध आज अखेर थांबवण्यात आला. मागील सहा दिवसांपासून शोधकार्य सुरू होते. प्रशासनाने शोधकार्य थांबवण्याचे सांगितल्याने, पथकाने आज नितीनचा शोध घेतला नाही.

अकोल्यातील विद्रुपा नदीत वाहून गेलेल्या तरूणाचा शोध अखेर थांबवण्यात आला

By

Published : Aug 4, 2019, 10:11 PM IST

अकोला - तेल्हारा तालुक्यातील भोकर येथील नितीन दामोदर हा 29 जुलै रोजी विद्रुपा नदीच्या पुरात वाहून गेला होता. त्याचा शोध घेण्याचे कार्य सुरू होते. परंतु, त्याचा अद्यापही शोध लागलेला नाही. पिंजरचे 'संत गाडगेबाबा आपत्तकालीन शोध व बचाव पथक' त्याचा शोध घेत होते. प्रशासनाने शोधकार्य थांबवण्याचे सांगितल्याने, पथकाने आज नितीनचा शोध घेतला नाही.

अकोल्यातील विद्रुपा नदीत वाहून गेलेल्या तरूणाचा शोध अखेर थांबवण्यात आला
संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांच्या नेतृत्वाखाली शोधकार्य सुरू होते. त्यांच्या पथकाने वांगेश्वर, तळेगाव, टाकळीमधील विद्रूपा नदीपात्रात नितीनचा शोध घेतला. परंतु, नितीन दामोदर हा सापडला नाही. तेल्हाराचे तहसीलदार संतोष येऊलीकर आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे यांच्या मार्गदर्शनात शोधकार्य सुरू होते. तळेगावपासून ते खिरोडापर्यंत नदीच्या दोन्ही बाजूंना शोध घेण्यात आला. नदीमध्ये मातीचे भूस्खलन झाले आहे. यामुळे नितीन दामोदर हा पूर्णा नदीपात्रात वाहत आला नसल्याची शक्यता आहे. या ठिकाणी बोट आणि माणसाला पोहचणे शक्य नसल्याने, शोधकार्याला वेळ लागत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details