अकोला- वाघ लुप्त होत चालल्याने त्यांच्या संवर्धनाची गरज निर्माण झाली आहे. ही प्रजाती जगवणे अत्यंत गरजेचं असल्याचे मत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.
वाघांचे संवर्धन ही काळाची गरज - जिल्हाधिकारी पापळकर - सामाजिक वनीकरण विभाग
वाघ लुप्त होत चालल्याने त्यांच्या संवर्धनाची गरज निर्माण झाली आहे. ही प्रजाती जगवणे अत्यंत गरजेचं असल्याचे मत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
अकोला वन्यजीव विभाग, सामाजिक वनीकरण विभाग व निसर्ग कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने आज(दि.२९ जुलै) आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त वसुंधरा हॉल येथील कार्यक्रमात ते बोलत होते. वन विभागचे उपवन संरक्षक सुधीर वळवी, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकरी विजय माने, वन्यजीव विभागाचे मनोज कुमार खैरनार, निसर्ग कट्टाचे प्रमुख अमोल सावंत हे उपस्थित होते.
यावेळी 'कौन बनेगा काटेपूर्णा अभयारण्य राजदूत' या नवीन संकल्पने अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. सर्वांनी वाघाचे संवर्धन व संरक्षण करण्याबाबत सर्वांनी शपथ घेतली. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांसाठी काटेपूर्णा अभयारण्यात जंगल सफारीचे अयोजन करण्यात आले होते. या वेळी जंगल सफारीच्या गाडीला जिल्हाधिकारी पापळकर यांनी हिरवा झेंडा दाखवला.