अकोला - गीता नगरातील खानावळीमध्ये घर करून बसलेल्या सापाला मानद वन्यजीव रक्षकांनी पकडून जीवदान दिले. हा साप धामण जातीचा आहे. त्यानंतर हा साप त्यांनी सुरक्षित ठिकाणी सोडून दिला.
खानावळीत लपलेल्या सापाला पकडण्यात सर्पमित्रांना आले यश - news about corona
खानावळीत लपलेल्या सापाला मानद वन्यजीव रक्षकांनी पकडून जीवदान दिले. या सापाला वन्यजीव रक्षकांनी सुरक्षित ठिकाणी सोडून दिले.

खानावळीत लपलेल्या सापाला पकडण्यात सर्पमित्रांना आले यश
खानावळीत लपलेल्या सापाला पकडण्यात सर्पमित्रांना आले यश
गीता नगरात असलेल्या खानावळीमध्ये साप असल्याची माहिती जय निसर्गसृष्टी सर्पमित्र तथा मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांना मिळाली. ते घटास्थळी पोहोचले. खानावळीमध्ये वापरण्यात येत असलेल्या भांड्याच्या जवळ हा साप लपलेला होता. मोठ्या शिताफीने त्यांनी हा साप पकडला. साप सात फूटाचा असून तो धामण जातीचा आहे. हा विषारी नसला तरी त्याची पकड घट्ट आहे. त्यामुळे त्याची भीती सगळ्यांनाच वाटते, असे बाळ काळणे यांनी सांगितले.