अकोला- कोरोना विषाणूपासून लढण्यासाठी अनेक जणांकडून मदत केली जात आहे. विविध स्वरूपात सरकारलाही मदत मिळत असून त्याचा नागरिकांनाही फायदा होत आहे. या मदतीमध्ये आता अकोल्याच्या दोन आमदारांनंतर केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनीही पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये एक कोटी रुपये दिले आहेत. राजकीय नेतेही मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.
लढा कोरोनासोबतचा: संजय धोत्रेंची पंतप्रधान सहाय्यता निधीत एक कोटीची मदत - केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे
अनेकजण मदतीसाठी सरसावले आहेत. उद्योजक, अभिनेते यांच्यासह विविध संस्था पुढे येत आहे. यामध्ये लोकप्रतिनिधीही मागे नाहीत. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनीही एक कोटी रुपयांची मदत पंतप्रधान सहाय्यता निधीत दिली आहे.
जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. याची झळ देशाला ही पोहोचली आहे. या विषाणूचा नायनाट करण्यासाठी आरोग्य विभागासोबत पोलीसदेखील कर्तव्य बजावीत आहेत. देशात लॉकडाऊन आहे. तरीही दिवसेंदिवस या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आर्थिक मदतीचीही गरज आहे.
अनेकजण मदतीसाठी सरसावले आहेत. उद्योजक, अभिनेते यांच्यासह विविध संस्था पुढे येत आहे. यामध्ये लोकप्रतिनिधीही मागे नाहीत. अकोल्यातील आमदार गोवर्धन शर्मा आणि आमदार रणधीर सावरकर यांच्या पाठोपाठ केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनीही एक कोटी रुपयांची मदत पंतप्रधान सहाय्यता निधीत दिली आहे.