अकोला- प्रभाग क्रमांक 7 तार फाईलमध्ये नागरिक सुरक्षित रहावे, म्हणून आज या परिसरात वंचित बहुजन आघाडी व प्रबुद्ध भारत बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र डोंगरे यांनी सॅनिटायझरची फवारणी केली आहे.
अकोल्यातील प्रभाग सातमध्ये सॅनिटायझरची फवारणी... - अकोला कोरोना व्हायरस बातमी
कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी देशभरात खबरदारी घेतली जात आहे. अनेक ठिकाणी सॅनिटायझर फवारणी करण्यात येत आहे. ज्या भागात ही फवारणी झाली नाही तिथे फवारणीची मागणी करण्यात येत आहे. परंतु, प्रशासनाकडून त्या ठिकाणी पोहोचण्यात वेळ लागत असल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण होत आहे.

हेही वाचा-मुंबईत कोरोनाचे आज 417 नवे रुग्ण; 20 जणांचा मृत्यू तर एकूण रुग्ण संख्या 6874 वर
कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी करण्यासाठी देशभरात खबरदारी घेतली जात आहे. अनेक ठिकाणी सॅनिटायझर फवारणी करण्यात येत आहे. ज्या भागात ही फवारणी झाली नाही तिथे फवारणीची मागणी करण्यात येत आहे. परंतु, प्रशासनाकडून त्या ठिकाणी पोहोचण्यात वेळ लागत असल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण होत आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 7 मधील वंचित बहुजन आघाडी व प्रबुद्ध भारत बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र डोंगरे यांनी पुढाकार घेत तारफाईल परिसरात सॅनिटायझरची फवारणी करुन तेथील नागरिकांना दिलासा दिला आहे. यासाठी चंद्रशेखर नकाशे, सचिन खोबरागडे, सिद्दु डोंगरे आदींनी परिश्रम घेतले आहेत.